Ziva Dhoni: एमएस धोणीच्या मुलीला थेट Lionel Messi कडून ख्रिमसमचं सरप्राईज गिफ्ट, साक्षीने शेअर केला फोटो

ziva-dhoni:-एमएस-धोणीच्या-मुलीला-थेट-lionel-messi-कडून-ख्रिमसमचं-सरप्राईज-गिफ्ट,-साक्षीने-शेअर-केला-फोटो

एमएस धोणीची लाडकी लेक झीवाला Lionel Messia कडून ख्रिसमचं खास गिफ्ट मिळालं असून या गिफ्टमुळे झीवा प्रचंड खूश झाली आहे

Updated: Dec 28, 2022, 02:02 PM IST

Ziva Dhoni Lionel Messi: लिओनेल मेस्सीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाने  (Argentina) तिसऱ्यांदा फुटबॉल वर्ल्ड कपवर (FootBall World Cup) आपलं नाव कोरलं. तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनाला ही कामगिरी करता आली. कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फीफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup 2022) च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनने गतविजेत्या फ्रांसवर चुरशीच्या लढतीत मात केली. लेओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने मिळवलेल्या या शानदार विजयाचा जल्लोष संपूर्ण जगभर करण्यात आला. अर्थात यात भारतही मागे नव्हता. अर्जेंटिनाने जेतेपद मिळवल्यानंतर भारतातही जल्लोष करण्यात आला.

धोणीच्या लेकीला मिळालं गिफ्ट
भारतातही लिओनेल मेस्सीचे असंख्य चाहते आहेत. विशेष म्हणजे भारताचा क्रिकेट संघाचा (Team India) सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोणीची (M S Dhoni)  लेक झीवाचा (ZIVA DHON) देखील मेस्सी हा आवडता खेळाडू आहे. आता तर झीवाच्या आनंदात आणखी भर पडली आहे. कारण तिच्या लाडक्या मेसीकडून झिवाला खास गिफ्ट मिळालं आहे. हे गिफ्ट पाहून झिवा प्रचंड खूश झाली आहे. 

साक्षी धोणीने शेअर केला फोटो
एमएस धोणीची पत्नी साक्षी धोणीने (Sakshi Dhoni) इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) झीवाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत झीवाने अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाची जर्सी घातल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे यावर लिओनेल मेस्सीने ऑटोग्राफ दिला आहे. ख्रिसमसला झीवा धोणीला मिळालेलं हे सर्वात बहुमल्य गिफ्ट आहे. 

जीवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा फोटो शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोला चाहत्यांचीही पसंती मिळतेय. एम एस धोणीही फूटबॉल खेळाचा मोठा चाहता आहे. क्रिकेट व्यतिरिक्त धोणी अनेक वेळा फुटबॉल खेळताना दिसला आहे.  आपल्या शालेय जीवनात धोणी शालेय संघाचा गोलकीपर होता. 

मेस्सीचं जय शहा यांना सरप्राईज गिफ्ट
काही दिवसांपूर्वीच लिओनेल मेस्सीने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांना एक सरप्राईज गिफ्ट पाठवलं होतं.  भारताचा माजी स्पिनर प्रज्ञान ओझाने त्यांच्या इन्ट्राग्रामवर त्याचा आणि जय शहा यांचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्या दोघांनीही मेस्सीने सही केलेलं अर्जेंटीनाचं टी-शर्ट पकडलेलं दिसतंय.  ओझाने हा फोटो पोस्ट करत त्यासाठी कॅप्शन लिहिलंय की, GOAT(लियोनेल मेस्सी) ने जय शहासाठी सही केलेली जर्सी आणि त्यासोबत शुभेच्छा पाठवल्या आहेत. हे किती उत्तम व्यक्तिमत्त्व आहे. मी आशा की, लवकरच मला माझ्यासाठी अशी जर्सी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *