Yuvraj Singh Net Worth : क्रिकेटमधून निवृत्ती…,तरीही युवराजचे रेकॉर्ड ब्रेक नेट वर्थ, जाणून घ्या

yuvraj-singh-net-worth-:-क्रिकेटमधून-निवृत्ती…,तरीही-युवराजचे-रेकॉर्ड-ब्रेक-नेट-वर्थ,-जाणून-घ्या

Happy Birthday Yuvraj Singh : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहचा (Yuvraj Singh Birthday) आज 41 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर क्रिकेटसह, बॉलिवूड विश्वातून शुभेच्छांचा वर्षात होत आहे. दरम्यान युवराज सिंहने (Yuvraj Singh) क्रिकेटमधून खुप आधीच संन्यास घेतला होता. त्यामुळे क्रिकेटपासून दुर असल्याने त्याचे नेट वर्थ (Net Worth) कमी असेल, असा एक कयास आहे. मात्र तसे अजिबात नाही आहे. क्रिकेटपासून दुर असला तरी त्याची कमाई खुप आहे. त्यामुळे नेमके त्याचे नेट वर्थ किती आहे, हे जाणून घेऊयात.  

युवराज सिंहने (Yuvraj Singh Birthday) क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम केले आहेत. या विक्रमासोबतच तो कमाई आणि लक्झरी लाईफस्टाईलच्या बाबतीतही पुढे आहे. क्रिकेटपासून दुर असला तरी त्याची कमाई खुप आहे. अनेक जाहिरांतीमधून तो आजही कमवतो. यासह आलिशान घर आणि कारचाही तो शौकिन आहे. त्याची कमाई विराट कोहली पेक्षा काही डॉलर्सनीच कमी आहे. 

अ‍ॅडस आणि चित्रपटातून कमवतो

युवराज सिंह (Yuvraj Singh Birthday) टीम इंडियासोबत त्याच्या करिअरमध्ये 2003 ते 2017 या तीनही फॉरमॅटमध्ये खेळला होता. या दरम्यान, तो ब्रँड एंडोर्समेंटमधील शीर्ष खेळाडूंमध्ये देखील होता. पेप्सी, बिर्ला सन लाइफ, रिबॉक, प्यूमा, कॅडबरी, व्हर्लपूल, रॉयल मेगा स्टॅग, एलजी, रिव्हिटल यासह अनेक ब्रँडशी त्याचा करार होता.युवराजने क्रिकेट खेळून आणि विविध ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम करून करोडोंची कमाई  केली आहे. याशिवाय त्याने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.यासह युवराजने अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे, ज्यातून त्याला भरपूर पैसा मिळतो. 

फिटनेस सेंटर्स 

युवराज सिंहचे (Yuvraj Singh Birthday) अनेक फिटनेस सेंटर्स आणि स्पोर्ट्स सेंटर्स देखील आहेत, ज्यातून तो मोठी कमाई करतो. म्हणजेच क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो कमाईच्या बाबतीत पुढेच आहे.

आलिशान कारचा शौकिन 

युवराज सिंह (Yuvraj Singh Birthday) चंदिगडमध्ये एका आलिशान घरात राहतो. त्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. 2010 मध्ये त्यांनी हे आलिशान घर खरेदी केले होते. याहस तो महागड्या आणि आलिशान गाड्यांचा शौकिन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या कलेक्शनमध्ये BMW M5 E60, BMW X6M, Audi Q5, Lombirigni Murcielago, Bentley Continental GT यांचा समावेश आहे.

एकूण संपत्ती किती? 

युवराज सिंह (Yuvraj Singh Birthday) हा क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंहची एकूण संपत्ती $35 दशलक्ष म्हणजेच जवळपास 289 कोटी रुपये आहे. तर, त्यांची वैयक्तिक मालमत्ता सुमारे 50 कोटी रुपयांची आहे.

कारकिर्द 

युवराज सिंहने (Yuvraj Singh Birthday) भारतासाठी 304 एकदिवसीय सामने खेळले असून 8,701 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, 40 कसोटी सामने आणि 132 आयपीएल सामने खेळले आहेत. 

दरम्यान सध्या तो क्रिकेटपासून दुर असला तरी त्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात नेहमीच असते. आज तो त्याच्या वाढदिवसामुळे चर्चेत आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *