World Test Championshipमध्ये पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम', भारताला होणार फायदा!

world-test-championshipमध्ये-पाकिस्तानचा-'करेक्ट-कार्यक्रम',-भारताला-होणार-फायदा!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final 2023) अनेक संघ शर्यतीत आहेत. पॉइंट टेबलमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Updated: Jan 2, 2023, 12:02 AM IST

World Test Championship Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final 2023) अनेक संघ शर्यतीत आहेत. पॉईंट टेबलमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेलं पाकिस्तान संघ आता बाहेर पडला आहे. याबाबत आयसीसीनेच (ICC) अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. (pakistan out of race world test championship 2023 latest marathi news)

पाकिस्तान (Pakistna) संघाला आता फायनलमध्ये पोहोचणं अशक्य असल्याचं सांगितलं. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कराचीतील मालिकेतील पहिला कसोटी सामना शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला. यासह डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळण्याचे पाकिस्तानचे स्वप्नही भंगलं आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये पाकिस्तान संघाला इंग्लंडने (PAKvsENG) व्हाईटवॉश दिला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.

Two Tests begin in the coming week

Can your team make it to the #WTC23 final?

Find outhttps://t.co/FLVV3aTaDN

— ICC (@ICC) January 1, 2023

पाकिस्तान संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. 2021-23 मध्ये पाक संघाने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. यामध्ये पाक संघाने 4 सामने जिंकले आहेत तर 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय पाकिस्तानचे 3 सामनेही अनिर्णित राहिले आहेत. सध्या या पॉइंट टेबलवर पाकिस्तान संघाला 38.46 टक्के गुण आहेत.

सध्याच्या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला अजून चार कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे 5, दक्षिण आफ्रिकेचे 3 आणि श्रीलंकेचे 2 सामने बाकी आहेत. ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीत जाणे जवळपास निश्चित झाले आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात लढत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *