Weather Update : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र गारठला, कसा असेल आठवडा?

मुंबई 02 जानेवारी : यंदा थंडीचा लहरीपणा पाहायला मिळाला. कधी थंडी तर कधी उकाडा, अशा बदलत्या वातावरणातच डिसेंबरचा शेवट झाला. मात्र आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात गारठा वाढला आहे. नववर्षाच्या दिवशी मुंबई शहराचं तापमान 15.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. शहरात आठवडाभर थंड आणि आल्हाददायक वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने 1 जानेवारी रोजी किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस आणि कमाल 29.5 (दोन्ही सामान्यपेक्षा दोन अंश कमी) दाखवले. थंडीच्या तडाख्याने आता महाराष्ट्रही गारठला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र गारठला. पुढचे आणखी काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update : विदर्भासह राज्यात कूल-कूल पारा आला 10 अंशावर, थंडी वाढणार
उत्तर भारतात थंडीची लाट
नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तर पश्चिम भारतातील बहुतांश राज्यांमध्येही थंडीची लाट परतली आहे. हवामान खात्यानुसार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस दाट धुके राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि चंदीगडमध्ये आज आणि उद्या थंडीची लाट कायम राहू शकते.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वायव्य भारतातील मैदानी भागात हिमालयातून येणाऱ्या वायव्येकडील वाऱ्यांमुळे येत्या दोन दिवसांत वायव्य आणि लगतच्या मध्य भारतात किमान तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव, आज उत्तर राजस्थानमध्ये तीव्र थंडीची लाट येऊ शकते. हवामान खात्यानुसार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, आसाम आणि त्रिपुरामध्ये पुढील दोन ते तीन दिवस दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.