Viral Video : Lionel Messi चा लहानपणीचा Interview व्हायरल, तेव्हा म्हणाला होता की, “दोन गोल…”

Lionel Messi: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील अंतिम फेरीत अर्जेंटिनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सना 4-2 ने पराभव केला. अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. लियोनेल मेस्सीचं स्वप्न या स्पर्धेत पूर्ण झालं आहे. लियोनेल मेस्सीचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे अर्जेंटिनाशिवाय इतर देशातही मेस्सीच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
Updated: Dec 21, 2022, 06:24 PM IST
Lionel Messi interview as kid viral on social media: फीफा वर्ल्डकप 2022 ( FIFA World Cup 2022 ) स्पर्धेतील अंतिम फेरीत अर्जेंटिनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सना 4-2 ने पराभव केला. अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. लियोनेल मेस्सीचं स्वप्न या स्पर्धेत पूर्ण झालं आहे. लियोनेल मेस्सीचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे अर्जेंटिनाशिवाय इतर देशातही मेस्सीच्या चाहत्यांनी जल्लोष केला. सोशल मीडियावर पोस्ट करून अनेक मेस्सी आणि अर्जेंटिना संघाला शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे, मेस्सी आणि त्याच्याशी निगडीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लहान असताना मेस्सीनं विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली होती.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत लहानग्या मेस्सीला मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाल्याची कल्पना आहे का, असा प्रश्न विचारला गेला. यावर मेस्सीने “नाही” असे उत्तर दिले होते. त्यानंतर त्याला त्याच्या ध्येयाबद्दल विचारण्यात आले आणि हा पुरस्कार कोणाला समर्पित करू इच्छितो. या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर तुमचं मन नक्कीच जिंकेल.
A young Lionel Messi speaks after a goalscoring performance for Newell’s Old Boys. This may be his first ever post-match interview. #Newells pic.twitter.com/wWI3o6kUZL
— Newell’s Old Boys – English (@Newells_en) November 5, 2021
- पत्रकार- तुझं नाव काय?
- उत्तर- लियोनल मेस्सी
- पत्रकार- सामनावीर पुरस्कारासाठी तुझी निवड झाली आहे, तुला याबाबत माहिती आहे का?
- उत्तर- नाही
- पत्रकार- दोन गोल कोणाला समर्पित करणार?
- उत्तर- माझे वडील, माझे काका आणि संपूर्ण कुटुंब…तसेच मला ओळखणाऱ्या सर्व चाहत्यांना
बातमी वाचा- FIFA World Cup 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी नेट कापली, कारण…
हा व्हिडीओ शेअर करताना पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘तरुण लियोनेल मेस्सी नेवेलच्या ओल्ड बॉईजसाठी गोल केलेल्या कामगिरीनंतर बोलत आहे. ही कदाचित त्याची मॅचनंतरची पहिलीच मुलाखत आहे.’ मेस्सीप्रेमींनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करून व्हायरल केला आहे.