Viral Video: अरे काय ते प्रेम! बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; पोलिसांच्या तावडीत सापडले अन्…

viral-video:-अरे-काय-ते-प्रेम!-बाईकवर-बेभान-जोडप्याने-ओलांडल्या-सर्व-मर्यादा;-पोलिसांच्या-तावडीत-सापडले-अन्…

Funny Couple Video: इंटरनेटवर व्हायरल (Video goes Viral on internet) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी (Bike Rider) चालवताना दिसतोय. या दुचाकीवर तरुणाची गर्लफ्रेंड (Girlfriend) देखील बसलेली दिसत आहे.

Updated: Dec 31, 2022, 07:17 PM IST

Bike Stunt Viral Video: प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हणतात. प्रेमासाठी (Love) कधी कोण काय करतील सांगता येत नाही. अनेकदा प्रेमी युगलांचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) व्हायरल होत असतात. अशातच आता एका व्हिडिओने सोशल मीडियावर अनेकांना वेड लावल्याचं पहायला मिळतंय. प्रेमी कपलचा (Trending Video Of Couple) हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू देखील आवरलं नाही. (dangerous bike stunt of young couple in love Visakhapatnam video goes viral on internet marathi news)

इंटरनेटवर व्हायरल (Video goes Viral on internet) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी (Bike Rider) चालवताना दिसतोय. या दुचाकीवर तरुणाची गर्लफ्रेंड (Girlfriend) देखील बसलेली दिसत आहे. तुम्हाला वाटत असेल ती त्याला मागे कवटाळून बसली असेल, तर तसं नाही. गर्लफ्रेंड त्याच्या मागे नाही तर गाडीच्या टाकीवर (bike stunt of young couple) बसलेली दिसत आहे.

आणखी वाचा – Video: अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा! दोघं फिरायला गेले, पोरीनं कॅमेरा सुरू केला अन् तेवढ्यात…

व्हिडिओमध्ये ती त्याच्या गळ्यात हात घालून गाडीवर बसलेली आहे. प्रेमी युगलाचा स्टंट (Bike Stunt Of girlfriend boyfriend) पोलिसांनी पाहिला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी कपलला ताब्यात घेतलं. मुलाचं वय 21 असून मुलीचं वय 19 वर्ष आहे. पोलिसांनी दोघांना समज देऊन सोडून दिल्याची माहिती समोर आलीये.

पाहा Video – 

pic.twitter.com/lKyW2gYUUj

— December 30, 2022

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ विशाखापट्टणममधील (Visakhapatnam Video) स्टील प्लॉटचा आहे. प्रेमात असलेला माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. पण एकवेळ तुम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा नसेल तरी इतरांचा जीव महत्त्वाचा आहे हे विसरता कामा नये. पालकांनी देखील आपल्या मुलांना समजूत देणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *