VIDEO – हाताने रिक्षा आणि पायाने मर्सिडीज; पुण्यातच दिसेल अशी भन्नाट ड्रायव्हिंग

पुणे, 15 डिसेंबर : गाडीतील इंधन संपत आलं आणि पेट्रोल पंपापर्यंत जाण्याचेही वांदे असतील तर वाहनचालकांना काय काय आटापिटा करावा लागतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जो तो घाईत असतो त्यामुळे मदतीची अपेक्षा तर कोणाकडून ठेवूच शकत नाही. पण जे इतर कुठे पाहायला मिळणार ते तुम्हाला पुण्यात मात्र मिळेल. पुण्यातील नागरिक प्रत्येकाच्या मदतीसाठी पुढे धावत असतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
पुण्यात एका रिक्षाचालकाने इंधन संपत आलेल्या मर्सिडीजची मदत केली आहे. इंधन संपत आलं तरी त्याने मर्सिडीज थांबून दिली नाही. हातात रिक्षाचं स्टेअरिंग धरत त्याने आपली रिक्षा चालू ठेवली आणि त्याचवेळी आपल्या जवळील मर्सिडीजला पायाने धक्का दिला. पुण्यात एखाद्या वाहनातील इंधन संपल्यास दुसरा वाहनचालक त्याला पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवण्यासाठी धक्का देत मदत करतो. इथं या रिक्षाचालकाने पायाने मर्सिडीजला धक्का दिला आहे.
हा व्हिडीओ कोरेगाव पार्कमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. एका नागरिकाने हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि तो आता तुफान व्हायरल होतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.