VIDEO – मालवणहून मुंबईत आला; सबनीसांच्या घरात राज्य करतोय 'रॉबर्ट' कोंबडा

video-–-मालवणहून-मुंबईत-आला;-सबनीसांच्या-घरात-राज्य-करतोय-'रॉबर्ट'-कोंबडा

मुंबई, 09 डिसेंबर : मुंबईत कोंबडा म्हटलं की तुम्हाला सहसा चिकन-मटनच्या दुकानातच पाहायला मिळेल. गावासारखं मुंबईत कुणी कोंबडा पाळत नाही. पण सध्या मुंबईतील एका घरात एक मालवणचा कोंबडा अगदी थाटात राहतो आहे. रॉबर्ट असं या कोंबड्याचं नाव. सबनीसांच्या घरात असलेला रॉबर्ट कोंबडा सध्या चर्चेता विषय ठरला आहे.

बोरिवरलीत राहणारे शिरीश सबनीस यांनी तीन वर्षांपूर्वी मालवणच्या बाजारातून एक कोंबडीचं पिल्लू विकत घेतलं. त्यांची मुलगी जान्हवीच्या हट्टापायी त्यांनी हे पिल्लू मुंबईत घरी आणलं. आज हे पिल्लू दोन वर्षे नऊ महिन्यांचं झालं आहे. या कोंबड्याची शिस्तप्रिय दिनचर्या आणि घरच्या सोबतच्या मौजमस्तीचे कौतुक होत आहे.

हे वाचा – VIDEO – समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात…

रॉबर्ट सकाळी आरवून सर्वांना जागं करतो. रविवारी सुट्टीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणाऱ्यांच्या अंगावर चढून तो त्यांना चोच मारून उठवतो. तेव्हा त्याला भूक लागलेली असते. शिरीष सबनीस यांनी बाहेर जाण्याची तयारी सुरू केली तर तो विशिष्ट आवाज करून कपड्यावर चोच मारतो. त्यालाही बाहेर जायचे असते. कधी कधी त्यालाही बाजारात घेऊन जावं लागतं. खाण्याच्या वेळेत बदल झाला की तो मानेने तुरा हलवत स्वयंपाक घरात घुसून जान्हवीला जोरजोरात आवाज देतो. जेवताना त्याला ताटातील थोडे अन्न बाजूला काढून द्यावं लागतं.

मुंबईतील सबनीसांच्या घरातील रॉबर्ट कोंबडा चर्चेत. pic.twitter.com/9GQYE8Y0BK

— News18Lokmat (@News18lokmat) December 9, 2022

जान्हवीची आई सुजाता दिवसभर त्याची काळजी घेतात. त्यांना त्याच्या आवडीनिवडी आणि सवयी व्यवस्थित ठाऊक झाल्या आहेत. दर रविवारी रॉबर्टला आंघोळ घालण्याचं काम शिरीष सबनीस करतात. सोसायटीतील मुलेही रविवारी खास रॉबर्टला भेटण्यासाठी येतात.

हे वाचा – इथे बकरी नाही तर चक्क बकरेच देतात दूध, किंमत ऐकून चकित व्हाल

अतिशय लाडात वाढवलेल्या या रॉबर्टला आपल्या प्रमाणेच राग येतो, तो चिडतो आणि मस्तीही करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *