VIDEO – मालकिणीने कानशिलात लगावली, नोकराने तिला मटण खायला घालून तिचं काळीज…

कराची, 26 ऑक्टोबर : कुणी आपल्याला मारलं तर आपला राग अनावर होतो. विशेषतः पुरुषांना महिलांनी तेसुद्धा सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर मारलं तर त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा अपमान असतो. या अपमानाचा बदला घेण्याच्या सूडातून ते काहीही करतात. अशाच एका 55 वर्षीय व्यक्तीला 22 वर्षांच्या तरुणीने मारलं. पण याचा शेवट असा झाला की पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
पाकिस्तानात राहणारी 22 वर्षांची आलिया आणि 55 वर्षांचा रफीक. दोघंही पहिल्यांदाच रिक्षात भेटले होते. त्यांच्यासोबत आणखी एक मुलगा होता. जो आलियाकडे पाहत होता. रफिकला हे खटकलं आणि त्याने त्या मुलासोबत वाद घातला. त्याला मारहाणही केली. शेवटी तो मुलगा निघून गेला. यानंतर रफिकही आलियाकडे टकामका पाहत राहिला. आलियाला ते आवडलं नाही. रफीक चांगला माणूस नाही, असं तिला वाटलं. त्यामुळे तिने त्याच्या कानशिलात लगावली.
हे वाचा – अजब प्रेमाची गजब कहाणी, उपचारांसाठी वेड्यांच्या इस्पितळात आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले
पहिल्या भेटीबाबत सांगताना आलिया म्हणाली, रिक्षात असलेल्या इतर मुलापेक्षा रफीक माझ्याकडे जास्त टकामका पाहत होता. मी त्याला कानशिलातही लगावली.
आलियाने मारल्यानंतर रफीक तिथंच थांबला नाही. रिक्षातून उतरल्यानंतर रफीकने तिचा पाठलाग केला आणि तो तिच्या घरापर्यंत पोहोचला. तिथून तो परतला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच्या घरी गेला. आलियासोबत त्याचा वाद झाला आणि तो पुन्हा आपल्या घरी आला. असं सलग तीन दिवस सुरू होतं. चौथ्या दिवशी आलियाने रफीकला काय हवं असं स्पष्टपणे विचारलंच.
आलियाच्या घरात एंट्री कशी मिळाली याबाबत रफीकने सांगितलं, मी आलियाला तिच्या घरात नोकरी मिळेल का असं विचारलं. मला जेवण चांगलं बनवता येतं आणि इतर घरातील कामंही करेन असं म्हणालो. रफीकला आलियाच्या घरात नोकरी मिळाली. आलियाच्या फर्माइशीनुसार रफीकने पहिल्या दिवशीच मटण हांडी बनवली. त्याने पहिल्याच दिवशी असं मटण बनवलं की ती त्याच्यावर फिदा झाली. आलियाला ती डिश इतकी आवडली की रफीकच्या प्रेमातच पडली.आलिया म्हणाली, माझं रफीकवर खूप प्रेम आहे, कारण तो ज्या पद्धतीने जेवण बनवतो आणि मला जेवू घालतो तसं दुसरं कुणीच करू शकत नाही.
हे वाचा – सहनही होईना आणि सोडताही येईना; बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडबाबत असं काही समजलं की तुम्हालाही बसेल धक्का
रफीकने आलियाला मटण खायला घातलं आणि इथूनच त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. त्या दोघांनी लग्नही केलं. आता रफीक घरातील सर्व कामं करतो आणि आलिया ऑनलाईन कमाई करते.
पाकिस्तानी यूट्युबर सैय्यद बासित अलीने आपल्या युट्यूब चॅनेलवर या कपलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात या कपलने आपली लव्ह स्टोरी सांगितली आहे. या पाकिस्तानी कपलची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.