VIDEO पुण्यातील कोयता गँगचा केला 'करेक्ट कार्यक्रम'; पोलिसांनी सांगितला तो अनुभव

पुणे, 30 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तसेच पुणे शहरामध्ये दहशत वाजवण्याचा प्रयत्न राजरोसपणे सुरू आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली.
तसेच परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनी भोसकले. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखविली जात होती. यामुळे वाहनधारक स्तब्ध झाले होते. अखेर पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी या दोघा गुंडांना चांगलाच चोप दिला. हातात कोयता घेऊन पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडलं.
यानंतर पुण्यातील सिंहगड रोड परिसरात कोयता गँगला पाठलाग करून पकडणाऱ्या त्या दोन धडाकेबाज पोलिसांवर आता समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत होत आहे. त्यांच्या या सिंघम स्टाईल धडाकेबाज कामगिरीमुळे पुणे पोलिसांचीही मान उंचावली आहे. म्हणूनच पोलीस दलाच्यावतीने एसीपी सुषमा चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला आहे. यानतंर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी यांनी exclusive संवाद साधला. या दहशतीच्या प्रवृत्तीला जरब बसावा, हाच विचार मनात होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. ऐका ते पोलीस कर्मचारी काय म्हणाले..
हेही वाचा – सराईत गुन्हेगारांचा कोयत्याने नागरिकांवर हल्ला; पोलिसांनी पाठलाग केला अन्.., पुण्यातील घटनेचा VIDEO
दरम्यान, यानंतर जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अत्यंत भयानक परिस्थिती सिंहगड कॉलेज परिसरात रात्र विद्यार्थ्यांना आणि रहिवाशांना अनुभवायला मिळाली. तर यानंतर अशा घटनांकडे भारती विद्यापीठ पोलीस दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.