VIDEO: पुण्यातल्या त्या शेतातील बटाटे पाहून सगळ्यांनाच बसला धक्का; असं काय आहे?

पुणे 02 डिसेंबर : निसर्गाच्या चमत्काराची एक बातमी पुण्यातून समोर आली आहे. खरं तर आश्चर्य निर्माण करणारी ही बातमी आहे. तुम्हाला कुणी विचारलं की बटाटे कुठे येतात? तर तुम्ही निश्चितच असं सांगाल की, जमिनीखाली. परंतु बटाटे जर टोमॅटोप्रमाणे जमिनीच्या वर झाडाच्या फांदीलाच लगडलेले असतील तर? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण विश्वास ठेवा आणि ही बातमी पाहा.
रोज बटाटे खाऊनही वजन होऊ शकतं कमी; संशोधकांचा दावा
हा अनोखा आविष्कार पाहायला मिळालाय आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात. या गावात बटाटा शेतीत एका झाडाला जमिनीच्या वरती चक्क बटाटे टोमॅटोप्रमाणेच झाडाच्या फांदीला लगडलेत. शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांची गण्या डोंगराच्याजवळ साडेतीन एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी बटाटा बियाण्याची लागवड केली आहे.
पुणे : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावात बटाटा शेतीत एका झाडाला चक्क जमिनीच्या वरती फांदीला टोमॅटोप्रमाणेच बटाटे लगडलेत. pic.twitter.com/cm8plaVPkw
— News18Lokmat (@News18lokmat) December 2, 2022
सध्या पीक काढणीला असल्याने पिकाचा पाला कापणी सुरू असताना एका झाडाच्या फांदीला चक्क बटाटे आढळून आले. झाडाच्या फांद्यांना लहान मोठे असे चक्क 17 ते 18 बटाटे मिळून आले.जमिनीत असलेल्या बटाट्याप्रमाणेच हे बटाटे असून थंडीमुळे ते जरा हिरवे पडले आहेत. झाडाला बटाटे आढळून आल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे. शेतकरी , नागरिक झाडाला लगडलेले बटाटे पाहण्यासाठी गर्दी करत आहे. आहे की नाही ही निसर्गाची किमया?
VIDEO – एक क्लिक आणि पाहा अद्भुत मॅजिक, पक्ष्यासारखा आकाशात उडू लागला माणूस
पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील या आगळ्यावेगळ्या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष बाब म्हणजे या झाडाला एक-दोन नाही. तर तब्बल 17 ते 18 बटाटे आलेले आहेत.
बटाटे जमिनीत येतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र बटाटे झाडाच्या फांदीलाच लगडलेले दिसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.