Video: नागिण डान्सला टक्कर देण्यासाठी आलाय कोंबडा डान्स… स्टेप्स एकदा पाहाच

video:-नागिण-डान्सला-टक्कर-देण्यासाठी-आलाय-कोंबडा-डान्स…-स्टेप्स-एकदा-पाहाच

मुलाने केलेला कोंबडा डान्स इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे, त्याच्या स्टेप्स बघून भले भले डान्सर थक्क  

Updated: Dec 22, 2022, 08:49 PM IST

Viral Dance: सोशल मीडियावर (Social Video) कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच काही व्हिडिओमधून (Video) काही जण रातोरात प्रसिद्धीच्या शिखरवार पोहोचलेत. मोबाईलमुळे एखादी घटना क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होते, आणि जगभरात पोहोचते. सध्या असचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत तुम्ही हिप हॉप, ब्रेक डान्स असे अनेक डान्स पाहिले असतील. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तरुणाने केलेला खतरनाक डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल. 

नागिण डान्सला टक्कर
भारतीय लग्नात आणि इतर कार्यक्रमात आपण नागिण डान्स पाहिला असेल. पण आता नागिण डान्सला (Nagin Dance) टक्कर देण्यासाठी नवा डान्स बाजारात आला आहे. या डान्समध्ये या तरुणाने अशा काही स्टेप्स केल्या आहेत की भलेभले डान्सरही त्याच्यासमोर फिके पडतील. या डान्सने सोशल मीडियावर तरुणांना वेड लावलं आहे 

काय आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका कार्यक्रमात एक मुलगा कोंबडा डान्स (Murga Dance) करताना दिसून येत आहे. बॅकग्राऊंडला कोंबडाच्या आवाजाचं म्युझिक वाजत असून या म्युझिकवर हा तरुण कोंबड्याच्या स्टेप्स करताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून हसू आवरता येणार नाही. विशेष म्हणजे या तरुणाचा कोंबडा डान्स नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे.

हा व्हिडिओ ashikali2158 या नावाने इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तरुणाचा हा कोंबडा डान्स आतापर्यंत 57 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर 2 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

हे ही वाचा : Grampanchayat Election : गाव तसं चांगलं, पण अंधश्रद्धेमूळे इज्जत वेशीवर टांगली

मोर डान्स झाला होता व्हायरल
काही महिन्यांपूर्वी असाच एक मोर डान्स सोशल मीडिावर व्हायरल झाले होते. एका कार्यक्रमात नाच रे मोरा या गाण्यावर तरुणाने केलेला मोर डान्स तुफान व्हायरल झाला होता. हा तरुण पुण्याचा असून त्याचं नवा अभी धाले असं आहे. एका लग्न समारंभात अभीने हा मोर डान्स केला. उपस्थित वऱ्हाडींपैकी काही जणांनी आपल्या मोबाईलवर अभीचा मोर डान्स चित्रीत करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर मोर डान्स महाराष्ट्रभर लोकप्रिय झाला. अनेकांनी त्याच्या डान्सचं कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *