Video : देवदूत! मृत्यूच्या दारात असलेल्या प्रवाशाला CISF जवानाने CPR देऊन वाचवला जीव

video-:-देवदूत!-मृत्यूच्या-दारात-असलेल्या-प्रवाशाला-cisf-जवानाने-cpr-देऊन-वाचवला-जीव

Trending Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रवाशासाठी जवान देवदूत ठरला आहे. 

Updated: Dec 24, 2022, 10:39 AM IST

video CISF jawan saved life passenger by giving CPR heart attack at ahmedabad airport viral on Social media nmp

CISF personnel performs CPR : यमराज आपल्याला कधी कुठे गाठेल हे कधी सांगता येतं नाही.  गेल्या काही वर्षांमध्ये कुठेही कधीही लोकांना हृदयविकाराचा झटका (heart attack) येतो आणि ते प्राणाला मुकतात. काहीसा प्रसंग एका प्रवासासोबत (passenger) आला. विमानतळावर (Airport Video) असंख्य लोक प्रवास करतात. असंख्य प्रवाशांच्या गर्दीत एक प्रवासी अचानक खाली कोसळला आणि त्यानंतर…थरकाप उडविणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे. 

काय घडलं नेमकं?

तो प्रवासी अचानक जमिनीवर कोसळला त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतं होता. त्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला होता. अशात विमानतळावर तैनात असलेल्या एका सीआयएसएफ जवान (CISF jawan) देवसारखा त्याचा मदतीला धावून आला. त्या जवाने त्या व्यक्तीला लगेचच सीपीआर (CPR) देऊन त्यांचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित इतर प्रवाशांनी कॅमेऱ्यात कैद केली. 

व्हिडिओ व्हायरल 

या व्हिडिओ भाजप नेते सुनील देवधर (BJP leader Sunil Deodhar) यांनी आपल्या ट्वीटर (Twitter)अकाऊंटवर शेअर केला आहे.  त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून नेटकरी CISF जवानाचे खूप कौतुक करत आहेत. प्रवाशासाठी देवदूत ठरलेल्या या जवानाला सगळे जण सॅल्यूट करत आहेत. (video CISF jawan saved life passenger by giving CPR  heart attack at ahmedabad airport viral on Social media)

कुठे घडली घटना?

ही घटना अहमदाबाद विमानतळावर घडली आहे. तो प्रवासी अहमदाबादहून (Ahmedabad news) मुंबईला (mumbai news) जात असताना ही घटना घडली. जेव्हा प्रवासी सुरक्षा तपासणीसाठी पोहोचला तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोसळला. जवानाच्या सर्तकतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. 

Prompt action of CISF Jawan’s saved a life at @ahmairport.
Salute to this great force  pic.twitter.com/miBP4g8Ft6

— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) December 22, 2022

आणि तो स्टेजवर कोसळला

अजून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. स्टेजवर नाटक करत असताना एक कलाकार अचानक स्टेजवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्या कलाकाराला मृत घोषित करण्यात आले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हा मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला.  कर्नाटकातील मंगळुरूमध्ये कातिलू जत्रा सुरू आहे. महाभारतावर आधारीत लोकनाट्य सुरु होतं.. यावेळी नाटकातील शिशुपालाची भूमीका साकारणाऱ्या गुरुवप्पा बायरु यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते स्टेजवरच कोसळले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *