Video: चालत्या ट्रेनसमोर त्याने केलं असं की मोटरमननं गाडी थांबवून चोपला

video:-चालत्या-ट्रेनसमोर-त्याने-केलं-असं-की-मोटरमननं-गाडी-थांबवून-चोपला

Boy Giving fyling Kiss To Train: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ नरेंद्र नावाच्या युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Updated: Dec 30, 2022, 08:11 PM IST

Boy Giving fyling Kiss To Train: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ नरेंद्र नावाच्या युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती रेल्वे रुळावर मस्ती करताना दिसत आहे. मात्र ट्रेनची गती कमी असल्याने अपघात घडला नाही. पण त्या तरुणाने केलेलं कृत्य पाहून तुम्हीही तसंच जसं की मोटरमननं केलं. या व्हिडीओत ट्रेनसमोर उभा राहून तो तरुण फ्लाइंक किस करत होता. ट्रेन जवळ येताच रुळावरून बाजूला झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. 

तरुणाचं असं कृत्य पाहून मोटरमनलाही राग अनावर झाला. ट्रेन पूर्णपणे थांबवल्यानंतर मोटरमन खाली उतरला. खाली उतरल्यानंतर आधी त्या तरुणाला पकडला आणि चांगलाच चोप दिला. सुरुवातीला तरुण दारू पिऊन असल्याचं वाटतं. मात्र त्यानं असं कृत्य केवळ मस्ती करण्यासाठी केलं होतं. 31 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.

शराबी व्यक्ति ने नशे में पटरी पर आ रही ट्रेन को रोका, लोको पायलट ने ट्रेन से उतर कर शख्स के कान और गाल कर दिए लाल…#trending #TrendingNews pic.twitter.com/I0nmo5Xtze

— Narendra Singh (@NarendraNeer007) December 29, 2022

या व्हिडीओखाली युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, लोको पायलटने जे काही केलं ते योग्यच आहे. आता असं कृत्य करताना तरुण दहावेळा विचार करेल. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, अशा बेवड्यांसोबत असंच व्हायला हवं. मोटरमननं बरोबरच केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *