Video: चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

video:-चंद्रकांत-पाटलांवर-शाईफेक;-तीन-जण-पोलिसांच्या-ताब्यात

पिंपरी चिंचवड 10 डिसेंबर : भाजप नेते, मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी  ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

BREAKING : वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, शाईफेक करणारा पोलिसांच्या ताब्यात#ChandrakantPatil pic.twitter.com/6DzrZwkk8Z

— News18Lokmat (@News18lokmat) December 10, 2022

तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये  मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते.  ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे आपल्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही चंद्रकांत पाटील यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानं आता वातावरण आणखी चिरघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  देवेंद्रजी भाजपाच्या लोकांना आवरा नाहीतर..; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर खैरेंचा इशारा

विरोधकांकडून टीकेची झोड 

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर  भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधकांकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र दिलगिरी व्यक्त केल्यानंतर देखील त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *