Video : खोल समुद्रात बर्निंग बोटचा थरार; 8 मच्छिमार थोडक्यात बचावले

सिंधुदुर्ग, 25 डिसेंबर, विशाल रेवडेकर : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या एका बोटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. पुण्यश्री असे या बोटीचे नाव आहे. या बोटीवर एकूण आठ खलाशी होते. त्यांना सुखरूप दुसऱ्या मच्छिमाऱ्यांच्या बोटीमध्ये स्थलांतरीत करण्यात आलं. या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र बोटीचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आगीचं कारण अस्पष्ट
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या एका बोटीने देवगडपासून समुद्रात 18 वाव आत अचानक पेट घेतला. पुण्यश्री असं या बोटीचं नाव आहे. या बोटीवर एकूण आठ जण होते. आग लागताच ते इतर मच्छिमारांच्या बोटीमध्ये स्थलांतरीत झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बोटीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
रत्नागिरी समुद्राच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्या एका बोटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यात बोटीचं मोठं नुकसान झालं आहे. pic.twitter.com/OIC9KwwXdC
— News18Lokmat (@News18lokmat) December 25, 2022
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या पथकाने खोल समुद्रात जाऊन जखमींना तातडीने मदत उपलब्ध करून दिली. त्यानंतर या बोटीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊन शकलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.