VASTU TIPS: या वस्तू घरात ठेवाल तर येईल दारिद्रय…ताबडतोब हलवा नाहीतर काढूनच टाका…

vastu-tips:-या-वस्तू-घरात-ठेवाल-तर-येईल-दारिद्रय…ताबडतोब-हलवा-नाहीतर-काढूनच-टाका…

वास्तुशास्त्रानुसार ताजमहालशी संबंधित कोणताही शोपीस किंवा फोटो घरात ठेवू नये. खरं बघायला गेलं तर ताजमहाल हे कबर आहे. ज्यामुळे त्याला मृत्यू किंवा निष्क्रियतेचे प्रतीक मानले जाते, असे केल्यास घरात क्लेश आजारपण आणि त्रास सुरु होतो. 

Updated: Dec 24, 2022, 01:37 PM IST

Vastu tips for prosperity: आपल्यापैकी बरेच लोक वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतात. बरेच लोक घराच्या बांधकामापासून ते त्याच्या सजावटीपर्यंत सगळं काम वास्तुशास्त्रारनुसार करतात. असे मानले जाते की, जर घरातील वास्तुशास्त्र चांगलं असेल. तर त्याचा चांगला परिणाम घरातील व्यक्ती आणि त्यांच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे बरेच लोक नवीन घर खरेदी करताना देखील वास्तुशास्त्रानुसारच ते विकत घेतात. वास्तुशास्त्रात वस्तुंशी संबंधीत असे अनेक नियम आहेत आणि त्याचा माणसाचे सुख आणि समृद्धीशी थेट संबंध असल्याचे मानले जाते. वास्तूनुसार काही वस्तू घरात ठेवणे अशुभ असते. असे मानले जाते की या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा ठेवतात. चला त्या गोष्टी कोणत्या आहेत, याबद्दल जाणून घेऊया.

तुटलेल्या काचेच्या वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे घरात जर चुकूनही अशी कुठलीही वस्तू असेल जी काचेची आहे आणि तिला तडा गेलेला आहे तर ताबडतोब ती वस्तू घरातून काढून टाका. 

आणखी वाचा: Fashion Tips: आयडियाची कल्पना…टाईट ब्लाऊजला न उसवता बसवा तुमच्या मापात, कसं ते पाहा…

घरामध्ये देवाची तुटलेली मूर्ती देखील ठेवू नये. भंग पावलेल्या मुर्त्या देवघरात ठेवल्या तर देवाची अवकृपा होते असं म्हटलं जात. जर तुमच्याकडे अशा मूर्ती असतील, तर लगेच त्याला आपल्या घरातून काढा. पाण्यात विसर्जित करा. 

वास्तूनुसार महाभारत, रामायण किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या युद्धांचे चित्र घरात ठेवू नये. खरे तर अशाप्रकारचे फोटो किंव चित्र घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर समन्वय चांगला राहत नाही.

वास्तूनुसार घरात लाकूड किंवा कोणत्याही धातूपासून बनवलेल्या कोणत्याही राक्षसाचे चित्र किंवा मूर्ती असू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात वावर करते. 

वास्तू तज्ज्ञांच्या मते, घरात सिंह, अस्वल, वाघ, लांडगे यांसारख्या वन्य प्राण्यांची चित्र किंवा फोटो देखील नसावेत.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काटेरी झाडे ठेवू नयेत. ज्यामध्ये तुम्ही फक्त गुलाबाचे रोप लावू शकता.

वास्तुशास्त्रानुसार ताजमहालशी संबंधित कोणताही शोपीस किंवा फोटो घरात ठेवू नये. खरं बघायला गेलं तर ताजमहाल हे कबर आहे. ज्यामुळे त्याला मृत्यू किंवा निष्क्रियतेचे प्रतीक मानले जाते, असे केल्यास घरात क्लेश आजारपण आणि त्रास सुरु होतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *