Urfi Javed विरोधात तक्रार दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई, 12 डिसेंबर : बिग बॉस ओटीटी फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. दररोज ती मुंबईच्या रस्त्यांवर नव्या अवतारात पहायला मिळते. अनेकवेळा उर्फी तिच्या असामान्य फॅशनमुळे ट्रोलिंगची शिकारही झाली आहे. पण तरीही ती लूक आणि कपड्यांवर प्रयोग करणे थांबवत नाही. उर्फी कधी कशापासून कोणता लुक बनवेल याचा काही नेम नाही. कायम नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असलेल्या उर्फीच्या अडचणी आता वाढल्या आहेत. तिच्याविरोधात एका वकिलाने तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे याविषयी जाणून घेऊया.
उर्फी जावेदविरोधात मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार अली काशिफ खान नावाच्या वकिलाने केली आहे. या तक्रारीमध्ये वकिलाने उर्फीवर अश्लिलता पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी 11 डिसेंबर रोजी पोलिसांनी उर्फीविरोधात तक्रार दाखल केली. आता या प्रकरणामुळे उर्फीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वकिलाने केलेल्या तक्रारीमुळे उर्फीला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उर्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. अतरंगी आणि बोल्ड ड्रेसिंगवरुन उर्फीला कायमच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे ती सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय असते. उर्फीची स्टाईल, तिचा बोल्ड अंदाज तिला आता अडचणींत टाकत आहे. लोक तिच्या बोल्डनेसमुळे तिला कायमच निशाण्यावर घेतायेत.
दरम्यान, कधी काच, प्लॅस्टिक, वर्तमानपत्र, ब्लेड, घड्याळ, वायर, खडे, फुलं, सगळ्याचं गोष्टींपासून उर्फीनं फॅशन आजमावली आहे. आणि प्रत्येक वेळी आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न उर्फी करत असते. हटके अंदाज फॅशन दाखवत ती आत्मविश्वासानं मीडियासमोर येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.