Urfi javed: युवराजच उर्फी जावेदबद्दल वक्तव्य,

urfi-javed:-युवराजच-उर्फी-जावेदबद्दल-वक्तव्य,

Urfi javed: हॉट फोटो पोस्ट करुन उर्फी सतत चर्चेत राहते. युवराजची कमेंट उर्फी पर्यंत पोहोचताच तिने उत्तर द्यायला जराही वेळ लावला नाही.

Urfi javed: युवराजच उर्फी जावेदबद्दल वक्तव्य, 'ती खरोखरच कलंक'

urfi-javed

Image Credit source: instagram

मुंबई: इंटरनेट सेंसेशन उर्फी जावेद तिच्या कपड्यांवरुन नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अलीकडेच दुबईमध्ये शूटिंग दरम्यान उर्फीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी आली होती. कपड्यांमुळे तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा होती. नंतर काही गैरसमजांमुळे पोलीस उर्फीच्या सेटवर गेले होते, अशी बातमी आली. उर्फीने त्यानंतर एक व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

उर्फीने युवराजला काय सल्ला दिला?

या व्हिडिओवर लोकांनी भरपूर कमेंट केल्या. भारताचा स्टार हॉकीपटू युवराज वाल्मिकीने सुद्धा तिच्या या पोस्टवर कमेंट केली. ही कमेंट खूप व्हायरल झाली होती. वाल्मिकीने केलेली कमेंट उर्फीपर्यंत पोहोचायला जराही वेळ लागला नाही. तिने उत्तर द्यायला जरासाही वेळ वाया घालवला नाही. उर्फीने कमेंट सेक्शनच्या चर्चेचा एक स्क्रिनशॉट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करुन हॉकीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला.

काय कमेंट केली?

युवराज वाल्मिकीने या संपूर्ण वादावर आपली बाजू मांडलीय. कमेंटवर स्पष्टीकरण देताना युवराज म्हणाला की, “उर्फीच डोक फिरलय, हे मी कधी बोललोच नाही. पण खरोखरच ती एक कलंक आहे”

कपड्यांवर कमेंट केली का?

युवराज वाल्मिकी मला मेसेज करतो, असा सुद्धा उर्फीने दावा केला होता. युवराजने कमेंटमध्ये म्हटलं होतं की, “थँक्यू दुबई, प्लीज कायमस्वरुपी तिला तुमच्याकडेच ठेवा” “मी कधीही तिच्या कपड्यांवर कमेंट केली नाही. तिला तुरुंगात पाठवा, असं मी कधीच म्हटलं नाही” युवराजने त्याच्या स्पष्टीकरणात हे सांगितलं.

उर्फीचा पब्लिसिटी स्टंट

माझ्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली, तर प्रसिद्धी मिळणार हे उर्फीला माहितीय, असं युवराज वाल्मिकी म्हणाला. उर्फीला कधीच मेसेज केला नाही, हे सुद्धा युवराजने स्पष्ट केलं. भारतीय हॉकी स्टार युवराजने उर्फीला चॅलेंज केलय. मी मेसेज पाठवले असतील, तर उर्फीने ते सार्वजनिक करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *