Urfi Javed | उर्फी जावेद हिचा चेहरा पाहून चाहत्यांना बसला मोठा धक्का, अभिनेत्रीच्या चेहऱ्याला जखम

urfi-javed-|-उर्फी-जावेद-हिचा-चेहरा-पाहून-चाहत्यांना-बसला-मोठा-धक्का,-अभिनेत्रीच्या-चेहऱ्याला-जखम

उर्फीला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.

मुंबई : उर्फी जावेद तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जाते. उर्फीला अनेकदा तिच्या हटके स्टाईलमुळे लोकांच्या टिकेला देखील सामोरे जावे लागते. काही दिवसांपूर्वीच उर्फीला एका ओळखीच्या ब्रोकरने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर उर्फीने त्या व्यक्तीचा फोटो आणि त्याने पाठवलेले मेसेज हे सोशल मीडियावर शेअर केले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला बिहारमधून अटकही केलीये. उर्फीला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.

काही दिवसांपूर्वी उर्फी ही दुबईला गेली असता तिथे तिला पोलिसांनी पकडल्याचे सांगितले जात होते. दुबईतील एका ठिकाणी शूटिंग करण्यास आणि व्हिडीओ तयार करण्यास मनाई असताना उर्फी ते करत असल्याने तिला पोलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले होते, अशी चर्चा होती.

नुकताच इंस्टाग्राम स्टोरीवर उर्फीने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये उर्फीच्या डोळ्याच्याखाली जखम झाल्याचे दिसत आहे. हे नेमके काय झाले याचा प्रश्न चाहत्यांना पडला असतानाच याचे कारणही उर्फीने थेट सांगून टाकले आहे.

Urafi javed

उर्फीने एक आय क्रीम मागवली होती आणि तिने डोळ्यांखाली ती लावली. मात्र हाच प्रयोग करणे आता उर्फीला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. कारण यामुळे उर्फीच्या डोळ्याखाली जखम झालीये.

इतकेच नाही तर या आय क्रीममुळे तिचा चेहराही सुजला आहे. उर्फीने हा फोटो शेअर केल्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उर्फीने काही दिवसांपूर्वी शर्ट न घालता हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेत एक व्हिडीओ शेअर केला होता.

आता उर्फीला ही जखम नेमक्या कोणत्या आय क्रीममुळे झालीये हा प्रश्न चाहते विचारताना दिसत आहे. कारण या आय क्रिममुळे फक्त डोळ्याखाली जखमच नाहीतर उर्फीचा पुर्ण चेहरा देखील सुजला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *