Urfi Javed: अंगप्रदर्शन अंगलट येणार? उर्फी जावेद हिच्यावर कारवाई होणार?; चित्रा वाघ यांची थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार

urfi-javed:-अंगप्रदर्शन-अंगलट-येणार?-उर्फी-जावेद-हिच्यावर-कारवाई-होणार?;-चित्रा-वाघ-यांची-थेट-पोलीस-आयुक्तांकडे-तक्रार

मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे.

Urfi Javed: अंगप्रदर्शन अंगलट येणार? उर्फी जावेद हिच्यावर कारवाई होणार?; चित्रा वाघ यांची थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार

अंगप्रदर्शन अंगलट येणार? उर्फी जावेद हिच्यावर कारवाई होणार?

Image Credit source: tv9 marathi

मुंबई : भररस्त्यात अंगप्रदर्शन करणं अभिनेत्री ऊर्फी जावेदला महागात पडण्याची चिन्हे आहेत. ऊर्फीच्या या वर्तनावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच पोलीस उर्फीवर काय कारवाई करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करून पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे उर्फीची तक्रार केल्याचं म्हटलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेण्यात आल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या तक्रारीचं पत्रंही त्यांनी ट्विट केलं आहे.

उर्फी जावेद या अभिनेत्रीने भररस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल, असं चित्रा वाघ यांनी या तक्रारीत म्हटलं आहे.

मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी
मुंबईचे मा[email protected] तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली @MumbaiPolice @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/M3HHpvTyMB

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 1, 2023

स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भररस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही.

मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उर्फीवर भारतीय दंड विधानाच्या कलम 294 नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांनाच तक्रारीचं निवेदन दिलं आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आता उर्फीवर कोणत्या कायद्याखाली कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *