Home » Uncategorized » बंद बेकायदेशीर, हिंसाचार सहन करणार नाही, केरळ हायकोर्टाचं PFI विरोधात कठोर पाऊल

बंद बेकायदेशीर, हिंसाचार सहन करणार नाही, केरळ हायकोर्टाचं PFI विरोधात कठोर पाऊल

बंद-बेकायदेशीर,-हिंसाचार-सहन-करणार-नाही,-केरळ-हायकोर्टाचं-pfi-विरोधात-कठोर-पाऊल

मराठी बातम्या /बातम्या

/देश

/

Kerala Hartal: बंद बेकायदेशीर, हिंसाचार सहन करू शकत नाही, केरळ हायकोर्टाचं PFI विरोधात कठोर पाऊल

Kerala Hartal: बंद बेकायदेशीर, हिंसाचार सहन करू शकत नाही, केरळ हायकोर्टाचं PFI विरोधात कठोर पाऊल

Kerala PFI hartal: केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर (KSRTC) तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोझिकोड, वायनाड आणि अलप्पुझा यासह केरळच्या विविध जिल्ह्यांमध्ये दगडफेक करण्यात आली. सकाळी कन्नूरमधील नारायणपारा येथे वितरणासाठी वर्तमानपत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले.

पुढे वाचा …

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  तिरुअनंतपुरम, 23 सप्टेंबर : केरळमध्ये कट्टर इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (PFI ) शुक्रवारी संप केला. केरळ बंद दरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. केरळ उच्च न्यायालयाने या घटनांची स्वत:हून दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने कठोरपणा दाखवत संपावर बंदी घातली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. अशा प्रकारे बंद कोणीही पुकारू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. संपावर बंदी घालणाऱ्या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य प्रशासनाला दिले आहेत. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना कराव्यात, असे न्यायालयाने सरकारला सांगितले. पीएफआई ने अपने नेताओं के कार्यालयों और आवासों पर एएनआई की छापेमारी का विरोध किया। पीएफआई ने शुक्रवार को बंद का ऐलान किया। शुक्रवार को सुबह 6 से शाम 6 तक बुलाए गए बंद के दौरान केरल के विभिन्न हिस्सों में हिंसा की छिटपुट घटनाएं हुईं। तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोझिकोड, वायनाड आणि अलप्पुझा यासह विविध जिल्ह्यांमध्ये केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर (KSRTC) दगडफेक करण्यात आली. सकाळी कन्नूरमधील नारायणपारा येथे वितरणासाठी वर्तमानपत्रे घेऊन जाणाऱ्या वाहनावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. वाचा – गाड्यांची तोडफोड, भाजप कार्यालयावर हल्ले; NIA च्या छापेमारीविरोधात PFI चं हिंसक आंदोलन काही जणांना किरकोळ दुखापत अलाप्पुझा येथे, KSRTC बसेस, एक टँकर लॉरी आणि काही इतर वाहनांचे कथितपणे संपाला पाठिंबा देणाऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत नुकसान झाले. कोझिकोड आणि कन्नूरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत 15 वर्षीय मुलगी आणि एक ऑटो-रिक्षा चालक किरकोळ जखमी झाला. सरकारचे कारवाईचे आदेश दरम्यान, पीएफआयने राज्यव्यापी बंद पुकारल्यानंतर केरळ पोलिसांनी राज्यात सुरक्षा वाढवली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एनआयएने कारवाई केली ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले त्या ठिकाणी गुरुवारी पीएफआय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. केंद्र आणि त्यांच्या तपास यंत्रणांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, सुरक्षा बळकट करण्यासाठी अशा सर्व ठिकाणी केंद्रीय दले आधीच तैनात करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष सीपी मोहम्मद बशीर, राष्ट्रीय अध्यक्ष ओएमए सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन एलमाराम, माजी अध्यक्ष ई अबुबकर आदींचा समावेश आहे.

  Published by:Rahul Punde

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Kerala

  Leave a Reply

  Your email address will not be published.