Umesh Kamat च्या वाढदिवशी प्रियाच्या हटके शुभेच्छा; शेअर केला 'तो' व्हिडीओ

umesh-kamat-च्या-वाढदिवशी-प्रियाच्या-हटके-शुभेच्छा;-शेअर-केला-'तो'-व्हिडीओ

मुंबई, 12 डिसेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेला पहायला मिळतो. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांसोबत कनेक्टेड असतो. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणूनही उमेशची एक वेगळीच क्रेझ आहे. आज उमेशचा वाढदिवस असून तो 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी त्याच्यावर आज भरभरुन शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री प्रिया बापटनेही त्याला खास पोस्टद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उमेश कामतची बायको अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या आणि उमेशच्या बऱ्याच आठवणींना एकत्र करुन त्याचा स्पेशल व्हिडीओ बनवला आहे. प्रियाने पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘हॅपी बर्थडे माय लाईफ’. उमेशचा आणि प्रियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उमेशवर त्याच्या खास दिवशी खूप सारं प्रेम, शुभेच्छा, आशिर्वादचा वर्षाव होत आहे.

मराठीतील लोकप्रिय जोड्यांपैकी उमेश-प्रियाला ओळखलं जातं. त्यांचे अनेक चाहते आहेत. उमेश कामत आणि प्रियाच्या कपल गोल्सनाही नेटकरी चांगलाच प्रतिसाद देत असतात. तब्बल 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची लवस्टोरीही फारच फिल्मी आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून एकमेकांसाठी खास पोस्ट शेअर करत असतात. त्यांचं हे प्रेम पाहून चाहतेही त्यांच्या पोस्टवर भरभरुन प्रेम देत असतात.

दरम्यान, उमेश कामतने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. अभिनेता उमेश कामतने मराठी मालिका,नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. तो सध्या ‘फू बाई फू’ मध्ये परिक्षकाची भूमिका साकारत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *