Uddhav Thackeray: 'भागवत साहेब सांभाळा, मिंधे गट RSS ऑफिसही बळकावतील'
Thackeray vs Shinde Group: नागपूर: मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेनेचे पक्ष कार्यालय (Shiv Sena party Office) शिंदे गटाने (Shinde Group) काल (29 डिसेंबर) ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली होती. मात्र, आता याच मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर टीका करतात करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) देखील चिमटा काढला आहे. नागपूरमधील (Nagpur) पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी बोचऱ्या शब्दात शिंदे गटावर टीका केली आहे. (shinde group will grab RSS office too shiv sena chief uddhav thackerays criticism)
‘काल मुंबई महापालिकेत मिंधे गट गेलं होतं आणि आज तर RSS कार्यालयात गेला होता. म्हणजे आज सुद्धा ते RSS कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते की काय याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. कारण आता शेवटी काय होतं.. ज्यांच्यामध्ये कर्तृत्व नसतं, स्वत: काही निर्माण करण्याची ताकद नसते, कुवत नसते ते सरळसरळ उघडपणे चोऱ्या करतात किंवा ताबा घेतात.
‘काय असतं की, मानसोपचार तज्ज्ञांना विचारण्याच विषय आहे. काही जणांच्या मनात एक न्यूनगंड असतो की, आपण काही करु शकत नाही. काही तरी केलं पाहिजे. ही त्यांना जाणीव असते. स्वत:च्या सुमार कुवतीची जाणीव असते.. मग ते न्यूनगंडाचं रुपांतर अहंगंडात करतात. पण तो कसा करतात की, दुसऱ्यांचे नेते चोरायचे, पक्ष चोरायचा, दुसऱ्यांचं ऑफिस बळकवायचं.’
‘आज मला RSS कार्यालयात ते गेले होते तिथून बाहेर पडले असावेत पण भागवत साहेबांना पण विचारतो की, जरा कोपरे-कोपरे तपासून बघा की कुठे लिंबू-टाचण्या वैगरे पडले आहेत का… बघून घ्या.’
‘असं म्हटलं ना मी, ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या ऑफिसवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला ना तसाच प्रयत्न त्यांनी आज RSS च्या कार्यालयाबाबतही केला असावा. कारण शेवटी यांची जी बुबुशित नजर आहे ती फार वाईट आहे. ज्याचा आम्ही अनुभव घेतलाय.’
‘जे काही चांगलं असेल ते जर करु शकत नसेल तर ते मिळवायचं कसं कब्जा कसा करायचा ही त्यांची वृत्ती आहे, जी घातक आहे. म्हणूनच RSS ने देखील यापुढे काळजी घेण्याची गरज आहे.’
‘जणू काही महाराष्ट्रात टोळ्यांचं राज्य आलेलं आहे की, काय अशी एक भावना जनसामान्यांमध्ये व्हायला लागलेली आहे. कुठेही जायचं आणि बळकवण्याचा प्रयत्न करयाचा.’
‘परत-परत मी हेच सांगतोय की, काल त्यांनी आमच्या मुंबई महापालिका कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आज ते RSS च्या कार्यालयात गेले होते. ठीकए RSS मजबूत आहे त्यामुळे ते ताबा घेऊ शकले नाही.’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.
आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटातील नेते नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.