Tyre Tips: गाडीच्या टायरची अशी घ्याल काळजी, या स्टेप्स फॉलो कराल

tyre-tips:-गाडीच्या-टायरची-अशी-घ्याल-काळजी,-या-स्टेप्स-फॉलो-कराल

अपघातात गाडीचा टायर हा देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. कारचा परफॉर्मेंस आणि मायलेज गाडीच्या मायलेजवर अवलंबून असतो. जर गाडीचा टायर पूर्णपणे घासलेला असेल तर तात्काळ बदलणं गरजेचं आहे. अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते. मात्र काही जण गाडीच्या टायरची किंमत पाहता बदलण्याकडे कानाडोळा करतात. 

Updated: Dec 5, 2022, 07:40 PM IST

Car tyre maintenance tips: गेल्या काही वर्षात रस्ते अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. रस्ते आणि गाडी चालवणं यामुळे बरेच अपघात टाळू शकता. अपघातात गाडीचा टायर हा देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. कारचा परफॉर्मेंस आणि मायलेज गाडीच्या मायलेजवर अवलंबून असतो. जर गाडीचा टायर पूर्णपणे घासलेला असेल तर तात्काळ बदलणं गरजेचं आहे. अन्यथा अपघात होण्याची शक्यता असते. मात्र काही जण गाडीच्या टायरची किंमत पाहता बदलण्याकडे कानाडोळा करतात. आज आम्ही तुम्ही काही टिप्स सांगणार आहोत, यामुळे टायर वर्षानुवर्ष व्यवस्थित राहतील आणि लवकर बदलण्याची गरज भासणार नाही. चला तर जाणून घेऊयात…

1. टायर स्वॅप करा- गाडीच्या टायरची क्षमता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टायर स्वॅप करा. प्रत्येक 5000 किलोमीटरनंतर आपल्या गाडीचे टायर स्वॅप करा. म्हणजेच पुढे लावलेले टायर मागे लावा आणि मागे लावलेले टायर पुढे फिट कराल.

2. व्हील अलाइनमेंट- गाडीच्या सुरक्षिततेसाठी व्हील अलाइनमेंट आणि बॅलेसिंग गरजेची आहे. अलाइनमेंट चुकली असेल तर टायर वेगाने घासतात. त्याचबरोबर स्टेअरिंगमध्ये वायब्रेशन जाणवतं. गाडीमध्ये प्रत्येक 10 हजार किलोमीटर एक टायर बॅलेंस जरुरी आहे.

बातमी वाचा- Laptop ची काळजी घेत Keyboard अशा पद्धतीने स्वच्छ कराल, जाणून घ्या सोपी पद्धत

3. इतर टिप्स- लांबच्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्या गाडीच्या टायर्सची तपासणी करणं गरजेचं आहे. यात योग्य एअर प्रेशर असणं गरजेचं आहे. मधेमधे गाडीचे टायर तपासणं गरजेचं आहे. जर टायरमध्ये कट किंवा फट असेल तर मॅकेनिकला दाखवणं जरूर आहे. जर टायर घासलेला असेल तर बदलणं गरजेचं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *