Turmeric Coffee: हळदीच्या कॉफीमुळे आरोग्याला होणारे हे फायदे माहीत आहेत का ? अशी बनवतात ही कॉफी

turmeric-coffee:-हळदीच्या-कॉफीमुळे-आरोग्याला-होणारे-हे-फायदे-माहीत-आहेत-का-?-अशी-बनवतात-ही-कॉफी

बहुतांश लोकांना कॉफी प्यायला आवडते, मात्र त्याच्या अतिसेवनाने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. पण तुम्हाला हेल्दी कॉफी प्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये हळद घालू शकता.

Turmeric Coffee: हळदीच्या कॉफीमुळे आरोग्याला होणारे हे फायदे माहीत आहेत का ? अशी बनवतात ही कॉफी

Image Credit source: Freepik

नवी दिल्ली – हळदीच्या दुधाचे (Turmeric milk) फायदे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहेत, पण तुम्ही कधी हळदीची कॉफी (Turmeric Coffee) प्यायली आहे का ? काय, हे नाव वाचून आश्चर्य वाटलं ना ? आपल्यापैकी बहुतांश लोकांना कॉफी प्यायला आवडते. बरेच लोक दिवसाची सुरुवातच एक कप कॉफीने करतात. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने किंवा कॉफीच्या अतिसेवनाने (excess drinking of coffee) आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यामधील कॅफेन हे शरीरासाठी फार फायदेशीर नसते.

तुम्हीही कॉफीचे शौकीन असाल आणि तुम्हाला हेल्दी हेल्दी कॉफी प्यायची असेल तर तुम्ही त्यामध्ये हळद घालू शकता. रिपोर्ट्सनुसार हळदीच्या कॉफीचे काही दुष्परिणाम नसतात, उलट ती आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचे काय फायदे आहेत व ती कशी तयार करतात हे जाणून घेऊया.

पचनक्रिया व्यवस्थित ठेवते

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात, हे सर्वांनाचा माहीत आहे. हळद ही हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. म्हणून हळदयुक्त कॉफीही फायदेशीर ठरते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

हळदीची कॉफी प्यायल्याने आपण शरीराला होणारे अनेक प्रकारचे इन्फेक्शन टाळू शकतो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत , ज्यामुळे ऋतूमानानुसार होणारे आजार टाळता येतात.

पोटातील जळजळ कमी होते

रिपोर्टनुसार, हळदीच्या कॉफीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे तत्वं पोटाची जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म हाडांच्या दुखण्यापासून आराम देण्यासाठी प्रभावी ठरतात.

अशी बनवा हळदीची कॉफी

ही आगळीवेगळी कॉफी बनवण्याची क्रिया अगदी सोपी आहे. एका कपमध्ये कॉफी घेऊन ती चांगली फेटावी. त्यानंतर एका भांड्याच दूध घेऊन त्यात एक चमचा हळद घालून ते चांगले उकळावे. त्यामध्ये फेटलेली कॉफी व थोडी साखर घालावी. थोड्याच वेळात तुमची हळदीची कॉफी तयार होईल. ही हेल्दी कॉफी प्या आणि भरपूर फायदे मिळवा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *