Tunisha Sharma Death : प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा;

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / बॉलीवूड – bollywood news
- Tunisha Sharma Death : प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा, शिझानने लग्नाला दिला नकार; ‘या’ अभिनेत्रीचा दावा
Tunisha Sharma : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रेग्नंट असल्याची माहिती समोर आली आहे.
By: लता शर्मा | Updated at : 25 Dec 2022 11:52 AM (IST)
Edited By: मंजिरी पोखरकर
Tunisha Sharma Death
Tunisha Sharma Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी ‘अली बाबा दास्तान ए काबुल’ (Ali Baba : Dastaan-E-Kabul) या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तिचा प्रियकर आणि सहकलाकार शिझान मोहम्मद खान (Sheezan Mohammad Khan) याला पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे.
प्रेग्नंट होती तुनिषा शर्मा!
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ‘मॅडम सर’ फेम प्रीती तनेजाने दावा केला आहे की, तुनिषा आणि शिझान रिलेशनध्ये होते. तुनिषा प्रेग्नंट असल्याने तिने शिझानकडे लग्नाची मागणी केली होती. पण शिझानने लग्नाला स्पष्ट नकार दिला. तरीदेखील तुनिषा त्याला लग्नासाठी विचारत राहिली पण शिझान मात्र लग्नाला नकार देत राहिला.
‘अली बाबी दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर तुनिषा शर्मा आणि शिझानची भेट झाली होती. या मालिकेच्या सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. पण 15 दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपनंतर ती नैराश्येत गेली. अखेर 24 डिसेंबर 2022 रोजी तिने आत्महत्या करत आयुष्य संपवलं.
तुनिषाच्या कुटुंबियांनी शिझानवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे. तुनिषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज सकाळी जेजे रुग्णालयात करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
Tunisha Sharma : तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या नेट वर्थ…
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात