Tunisha Case: वासनेची भूक मिटवण्यासाठी त्याने.. ; तुनिशाच्या मैत्रिणीचा धक्कादायक दावा

tunisha-case:-वासनेची-भूक-मिटवण्यासाठी-त्याने.-;-तुनिशाच्या-मैत्रिणीचा-धक्कादायक-दावा

“शिझानचं अनेक महिलांसोबत संबंध”; तुनिशाच्या आत्महत्येनंतर मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा

Tunisha Case: वासनेची भूक मिटवण्यासाठी त्याने..; तुनिशाच्या मैत्रिणीचा धक्कादायक दावा

तुनिशाच्या आत्महत्येनंतर मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा

Image Credit source: Instagram

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खानवर गंभीर आरोप होत आहेत. तुनिशाच्या आईच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी शिझानला अटक केली आहे. शिझानने तुनिशाला लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर ब्रेकअप केलं, असा आरोप तिच्या आईने केला. आता याप्रकरणी तुनिशाच्या मैत्रिणीने धक्कादायक खुलासा केला आहे. वासनेची भूक मिटवण्यासाठी शिझानने अनेक महिलांचा वापर केला, असा दावा अभिनेत्री आणि तुनिशाची मैत्रीण राया लबिबने केला आहे.

शिझानने तुनिशाची फसवणूक केली. यामुळे ती नैराश्यात होती आणि तिला पॅनिक अटॅकही यायचे, असं तुनिशाच्या काकांनी सांगितलं. आता रायानेही म्हटलंय की शिझानचं अनेक तरुणींसोबत अफेअर होतं. तो एकाच वेळी अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता, असा धक्कादायक खुलासा रायाने केला.

“शिझाने बरेच अफेअर्स होते. त्याच्या बऱ्याच गर्लफ्रेंड्स होत्या. त्याचे सहा ते दहा महिलांसोबत शारीरिक संबंध होते. शिझानला डेट केलेल्या एका मुलीकडून मला याची माहिती मिळाली. त्या मुलीसोबत शिझान रिलेशनशिपमध्ये होता आणि चार महिन्यांपूर्वी तुनिशाच्या भेटीनंतर त्याने तिच्याशी ब्रेकअप केलं. ती मुलगी आता नैराश्यात आहे आणि मानसिक उपचार घेतेय. तिला याबद्दल कोणाशीच बोलायचं नाहीये”, असं रायाने सांगितलं.

“शिझानने त्याची शारीरिक भूक मिटवण्यासाठी अनेक महिलांचा वापर केला. तो त्यांना प्रेम आणि कमिटमेंटचं आश्वासन द्यायचा. शिझानचं दिसणं आणि मैत्रीपूर्ण स्वभाव यांमुळे त्या मुली त्याच्या जाळ्यात अडकायच्या. मात्र शिझान त्यांच्यासोबत फक्त शारीरिक संबंधासाठी राहायचा. त्याला प्रेमात अजिबात रस नव्हता. त्याने तुनिशासोबतही हेच केलं”, असं ती पुढे म्हणाली.

“तुनिशाला जेव्हा शिझानच्या एक्स गर्लफ्रेंड्सविषयी समजलं, तेव्हा तिने त्याला जाब विचारला होता. मात्र ब्रेकअप केल्यानंतर मी तुला उत्तर द्यायला बांधिल नाही, असं शिझान तिला म्हणाला. यानंतरच तिने स्वत:चा जीव घेतला,” असा आरोप रायाने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *