Suryakumar Yadav सह हे 3 खेळाडू होणार मालामाल; सीनिअर खेळाडूंना मोठा धक्का

suryakumar-yadav-सह-हे-3-खेळाडू-होणार-मालामाल;-सीनिअर-खेळाडूंना-मोठा-धक्का

BCCI Central Contracts 2023: बीसीसीआय (BCCI) लवकरच एका मोठा निर्णय घेणार आहे. ज्या खेळाडूंचा खेळ चांगला नाही, अशा खेळाडूंना टीम इंडिया कॉन्ट्रॅक्टपासून (BCCI Central Contracts 2023) बाहेर करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. खेळाडूंची खराब फलंदाजी आणि गोलंदाजी हे यामागील प्रमुख कारण आहे. याशिवाय बीसीसीआय त्या खेळाडूंचं प्रमोशन (BCCI Promotion) करणार आहे, जे खेळाडू सातत्याने टीम इंडियासाठी चांगला खेळ करतायत. त्यामुळे यावेळी काही खेळाडूंवर बीसीसीआयकडून पैशांची बरसात होण्याची शक्यता आहे. 

सूर्यकुमार, गिल आणि हार्दिकचं होणार प्रमोशन (Suryakumar, Gill and Hardik)

बीसीसीआयने खेळाडूंच्या सॅलरी संदर्भात एका सूची जाहीर केली आहे. खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स पाहून ही सूची तयार करण्याच आली आहे. त्यामुळे याला ए, बी, सी आणि डी ग्रेडनुसार जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला टीम इंडियाचे अनेक युवा खेळाडू त्याच्या उत्तम खेळाने छाप पाडतायत. त्यांच्या याच खेळाचा फायदा त्यांना होणार आहे. 

पीटीआयच्या एका अहवालानुसार, नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

हे तिन्ही खेळाडू ग्रेड सी मध्ये समाविष्ट होते. मात्र आता नव्या यादीनुसार, त्यांचं स्थान बदललं जाणार आहे. मात्र अजून या गोष्टी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. बीसीसीआय या खेळाडूंना बक्षीस म्हणून गडगंज पगार देणार आहे. 

काही खेळाडूंना वगळण्याची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 3 खेळाडूंना वगळणार असल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयची 21 डिसेंबरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अजिंक्य रहाणेसह इंशात शर्माला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून हटण्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. तर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्याला बढती मिळणार असल्याचं समजतंय.  रहाणे आणि इशांत हे बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार या दोघांना वार्षिक 3 कोटी आहे.  

पीटीआयनुसार, रहाणे इशांतचा पत्ता कट होणार असल्याचं निश्चित आहे. सोबतच विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहालाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कारण साहाला सुरुवातीलाच त्याची निवड होणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *