Sunil gavaskar: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना मातृशोक; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

sunil-gavaskar:-माजी-क्रिकेटपटू-सुनील-गावस्कर-यांना-मातृशोक;-कुटुंबावर-दुःखाचा-डोंगर!

Meenal Gavaskar Passed Away: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या कॉमेन्ट्रीसाठी गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये आहेत. अशातच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Updated: Dec 25, 2022, 07:19 PM IST

Sunil Gavaskar mother : टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सुनील गावस्कर यांच्या आईचे निधन झाले आले. मीनल गावस्कर (Meenal Gavaskar Passed Away) यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. अशातच 95 व्या वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे गावस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (sunil gavaskar mother meenal gavaskar passed away at age of 95 marathi news)

सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar’s mother Passed Away) यांच्या आई मिनल गावस्कर यांच वृध्दपकाळानं निधन झालं. भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या समालोचनासाठी गावस्कर सध्या बांग्लादेशमध्ये आहेत. रविवारी सकाळी मीनल गावस्कर यांचं निधन झाल्याची बातमी सुनिल गावस्कर यांना समजली.

आणखी वाचा – BCCI निर्णयावर Sunil Gavaskar चांगलेच भडकले, म्हणाले “तुम्ही त्याचं टॅलेंट खराब करताय…”

गावस्कर यांच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून बरी नव्हती. याच कारणामुळे गावस्कर आयपीएलच्या गेल्या हंगामाच्या नॉकआऊट फेरीत कॉमेंट्रीसाठीही उपस्थित नव्हते. सुरूवातील सामन्यांनंतर गावस्कर आपल्या आईची काळजी घेण्यासाठी घरी परतले होते. त्यावेळी त्यांच्या प्रकृती सुधारणा झाल्याचं दिसत होतं.

Sunil Gavaskar’s 95 yr old mother Minal passed away this morning in Bombay. Rest In Heaven Aai.

— Makarand Waingankar (@wmakarand) December 25, 2022

दरम्यान, 73 वर्षाचे गावस्करांची भारताच्या महान फलंदाजांमध्ये गणना होते. 1971 ते 1987 पर्यंत सुनिल गावस्कर यांची दहशद पहायला मिळाली. भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजण्याचं काम सुनिल गावस्कर यांनी केलंय. 125 टेस्टमध्ये 10,125 धावा करण्याचा भीमपराक्रम सुनिल गावस्कर यांनी करून दाखवला आहे. मात्र, सध्या गावस्कर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *