Special Report : मुंबई आणि कोल्हापुरात संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलनं, मराठा आंदोलकांची नेमकी मागणी काय?

special-report-:-मुंबई-आणि-कोल्हापुरात-संजय-राऊत-यांच्या-विरोधात-आंदोलनं,-मराठा-आंदोलकांची-नेमकी-मागणी-काय?

मराठा मोर्चा सुद्धा महाराष्ट्राचीच ताकद होती आणि आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चात ही ताकद सहभागी झालीच होती.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संजय राऊतांच्या विरोधात आक्रमक झालेत. मविआच्या मोर्चावरुन, मराठा मोर्चाचा व्हिडीओ ट्विट केल्यानं राऊतांच्या आंदोलनं सुरु झालीत. मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला, उपमुख्यमंत्र्यांनी नॅनो मोर्चा म्हटलं. आणि याच नॅनो शब्दावरुन राजकीय घमासान सुरु असतानाच, राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडीओनं नवा वाद सुरु झाला. कारण संजय राऊतांच्या विरोधात आता मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आणि राऊतांच्या विरोधात आंदोलनं सुरु झालीत. त्याच कारण आहे, राऊतांनी ट्विट केलेला व्हिडीओ. महाविकास आघाडीचा मोर्चाची दृश्यं दाखवण्यासाठी राऊतांनी जो व्हिडीओ ट्विट केला तो मराठा मोर्चाचा होता, असं सांगण्यात येतंय.

मुंबई आणि कोल्हापुरात राऊतांच्या विरोधात आंदोलनं झालीत. मुंबई आणि कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते राऊतांच्या विरोधात आक्रमक झाले. मराठा क्रांती मोर्चाकडून शिवसेना भवनासमोरच, राऊतांच्या फोटोला काळं फासलं आणि जोरदार घोषणाबाजीही केली.

संजय राऊत मराठा समाजाच्या मोर्चाला, मविआचा मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं राऊतांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देऊन, कलम 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी केलीय.

पण अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवसआधी उपमुख्यमंत्र्यांनीही राऊतांनी ट्विट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चाच आहे, असं सांगून मविआच्या मोर्चाला पुन्हा एकदा नॅनो म्हटलं. जरुर चौकशी करा. मराठा मोर्चा सुद्धा महाराष्ट्राचीच ताकद होती आणि आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चात ही ताकद सहभागी झालीच होती. करा चौकशी. आपल्या चोर कंपनीला क्लीनचिट देणे आणि राजकीय विरोधकांची चौकशी करणे हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम झालाय, असा आरोप करण्यात येतोय.

फडणवीसांच्या नॅनो मोर्चा या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊतांनी जो व्हिडीओ ट्विट केला. त्यावर राऊतांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच. म्हणजेच हा मविआचाच मोर्चा आहे हे सांगण्याचा प्रयत्न राऊतांनी केला असाच त्याचा अर्थ होतो. मात्र आता आपण ट्विट केलेला व्हिडीओ हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, असं बोललोच नसल्याचं राऊत म्हणतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *