Special Report : महापालिकेत ठाकरे गट-शिंदे गटात राडा, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकारण पेटले

special-report-:-महापालिकेत-ठाकरे-गट-शिंदे-गटात-राडा,-निवडणूक-जाहीर-होण्यापूर्वीच-राजकारण-पेटले

शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

मुंबई : महापालिकेत ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. मुंबई मनपा कार्यालयात आज दोन्ही गट आमनेसामने आले. महापालिकेतील कार्यालयावर शिंदे गटानं दावा केला. त्यानंतर हा राडा झाला. शिंदे गटाकडून चाळीस खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तर ठाकरे गटाकडून एयूची घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटाच्या नेत्यांची आयुक्तांसोबत बैठक होती. या बैठकीनंतर शिंदे गटाचे नेते महापालिकेच्या शिवसेनेच्या कार्यालयात गेले. कार्यालयातील यशवंत जाधव यांच्या नावावर पट्टी बांधण्यात आली होती. ही पट्टीदेखील राहुल शेवाळे यांनी काढून टाकली. या बैठकीनंतर शिंदे गटाचे नेते शिवसेनेच्या कार्यालयात गेले. त्यानंतर शिवसेना गटाच्या नेत्य़ांनी शिंदे गटाच्या कार्यालयाचा ताबा घेतला.

शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

राहुल शेवाळे म्हणाले, मुंबईच्या आयुक्तांसोबत बैठक झाली. धोरणात्मक निर्णय झाले. मुंबईच्या विकासाचे कामं होत आहेत. त्याचा निर्णय करण्यात आला. शिवसेनेच्या नावानं दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला, हे दुर्वैदी आहे.

आम्ही येथे होतो. येथेचं राहणारे, असं ठाकरे गटानं ठणकावूनं सांगितले. आयुक्तांनी मुंबईच्या विकासासाठी चांगले निर्णय घेतले. या निर्णयाला गालबोट लावण्याचं काम करतात, असंही सांगण्यात आलं. शिवसेना कार्यालय आमचंही आहे. घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न झाला. हे खपवून घेणार नसल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

आम्ही येथे असताना हे आले नाहीत. ते आम्ही असताना आलो असतो तर ते मर्द असल्याचं सांगितलं. मुंबई मनपा निवडणुका जवळ आल्यात. कार्यकाळ संपला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जनता असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *