Special Report : आधी अजित पवार आता जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य, …तर औरंगजेबानं विष्णूचं मंदिरही तोडलं असतं

special-report-:-आधी-अजित-पवार-आता-जितेंद्र-आव्हाड-यांचं-वादग्रस्त-वक्तव्य,-…तर-औरंगजेबानं-विष्णूचं-मंदिरही-तोडलं-असतं

उगाच इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असा सल्लाही आव्हाड यांनी दिलाय.

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार अडचणीत आलेत. त्यात आता जितेंद्र आव्हाड यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. आव्हाडांच्या वक्तव्यानं नव्या वादाची ठिणगी पडली. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणतो. काही जणं धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवार म्हणाले. पवार यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यावरून महाराष्ट्रात आंदोलनं सुरू झालीत. औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. संभाजी महाराज यांना बहादूरगडावर नेण्यात आलं तिथं त्यांचे डोळे काढण्यात आले. औरंगजेब हिंदू द्वेष्टा असता तर त्यानं विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असंही आव्हाड म्हणाले. उगाच इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असा सल्लाही आव्हाड यांनी दिलाय.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवार यांनी नेमका कोणता अर्थ लावला, असा थेट सवाल केला. संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेतच, पण धर्मवीरही असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. कुठला रेफरन्स घेऊन त्यांनी हे वक्तव्य केलं, ते सांगाव. ऐतिहासिक प्रतिक्रिया देताना अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात रस्त्यावर रोष दिसतोय. नाशिकमध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. बारामतीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेतालं वक्तव्य केलं. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केलं. त्यांना आधी पाकिस्तानला पाठवा. नंतर आपण बघू की, अजितदादांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे की, नाही, असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *