Sourav Ganguly : क्रिकटप्रेमींसाठी New Year ची भेट, सौरव गांगुलीने शेअर केली 'ही' मोठी बातमी

Sourav Ganguly Biopic: सौरव गांगुलीने स्वत: ट्विट करून त्याच्या बायोपिकची घोषणा केली आहे. मात्र, चित्रपटाचे नाव, प्रदर्शनाची तारीख आणि कलाकारांबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
Updated: Jan 1, 2023, 03:18 PM IST
Sourav Ganguly Biopic : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी शेअर केली आहे. गांगुलीने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याच्या बायोपिक (Sourav Ganguly Biopic) संदर्भात ट्विट करून चाहत्यांना भेट दिली आहे. गांगुलीने याआधीही एका मुलाखतीत त्याच्या बायोपिकची पुष्टी केली असली तरी यावेळी त्याने ट्विट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सौरव गांगुलीने बायोपिकची घोषणा करताना तो म्हणाला की त्याची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.
बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या चित्रपटाची निर्मिती लव फिल्म्स करणार असून लव रंजन दिग्दर्शित करणार आहेत. गांगुलीच्या आधी महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), बबिता फोगट (Babita Phogat), मिल्खा सिंग (Milkha Singh) आणि सायना नेहवाल (Saina Nehwal) यांसारख्या अनेक खेळाडूंवर बायोपिक बनवले गेले आहेत. आता क्रीडा व्यक्तिमत्त्वांमध्ये पुढील बायोपिकचा क्रमांक सौरव गांगुलीचा आहे. मात्र, या चित्रपटात सौरव गांगुलीची भूमिका कोण साकारणार आहे. याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
वाचा : भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? ‘या’ 3 मधून कोण होणार विकेटकीपर?
याबाबत स्वत: सौरव गांगुलीने ट्विट केले की, ‘क्रिकेट हे माझे आयुष्य आहे. याने मला आत्मविश्वास आणि डोके उंच धरून पुढे चालण्याची क्षमता दिली. जगायचा प्रवास. माझ्या प्रवासावर लव फिल्म्स एका बायोपिकची निर्मिती करणार आहे आणि मोठ्या पडद्यावर ते जिवंत करणार आहे याचा आनंद आहे.”
pic.twitter.com/sX3ht04VYP
— Sourav Ganguly (@SGanguly99) January 1, 2023
दरम्यान, या बायोपिकमध्ये सौरव गांगुली यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. लव्ह रंजन यांनी यापूर्वी ‘दे दे प्यार दे’, ‘छलांग’, मलंग, यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय.