Snehlata Vasaikar :

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / टेलिव्हिजन
- Snehlata Vasaikar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून स्नेहलता वसईकर आऊट; पोस्ट शेअर करत म्हणाली,”‘Bigg Boss’चा प्रवास इथेच संपला असला तरी…”
Snehlata Vasaikar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून स्नेहलता वसईकर आऊट; पोस्ट शेअर करत म्हणाली,”‘Bigg Boss’चा प्रवास इथेच संपला असला तरी…”
Snehlata Vasaikar
Snehlata Vasaikar : ‘बिग बॉस मराठी’चं (Bigg Boss Marathi 4) घर या आठवड्यात सदस्यांनी चांगलंच गाजवलं नाही तर घरात धुडगूस घातला. या आठवड्यात स्नेहलता वसईकरला (Snehlata Vasaikar) घराबाहेर पडावं लागलं आहे. या पर्वात स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती.
‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) चावडीत महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) प्रत्येक स्पर्धकांची शाळा घेणार असं वाटत होतं. पण त्यांनी गोड शब्दात सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. शेवटी स्नेहलता आणि विकास डेंजर झोनमध्ये होते. यातून स्नेहलताला घर सोडावं लागलं. स्नेहलता घराबाहेर पडल्याने अपूर्वा, अक्षयला अश्रू अनावर झाले.
स्नेहलता वसईकरने घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने लिहिलं आहे,”बिग बॉसचं घर असो किंवा माझा कुठला ही नवा प्रवास..तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून जे प्रेम सातत्याने करत आहात त्यासाठी मनापासून आभार.. ‘बिग बॉस’चा प्रवास इथेच संपला असला तरी नव्या वर्षात नवीन भूमिकेत भेटूच…तुमचं हे प्रेम, खंबीर पाठिंबा कायम राहू दे”.
बिग बॉस मराठीच्या घरात दररोज टास्कवरुन किंवा घरातील कामावरून वाद होत असतात. पण या आठवड्यात कोणीच कोणापेक्षा कमी नव्हतं असं दिसलं. राखीचं वागणं, अक्षय – प्रसादचं भांडणं, अपूर्वा विकासची खडाजंगी, प्रसाद – अमृतामध्ये झालेली बाचाबाची असो किरण माने आणि अमृता धोंगडे मध्ये झालेले कडाक्याचे भांडणं असो हा आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री; योगेश जाधवची एक्झिट
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात