Snakes Mating : नाग-नागिणीचे प्रायव्हेट क्षण कॅमेऱ्यात कैद; इंटरनेटवर video viral

snakes-mating-:-नाग-नागिणीचे-प्रायव्हेट-क्षण-कॅमेऱ्यात-कैद;-इंटरनेटवर-video-viral

 नाग आणि नागिण एकमेकांच्या सहवासात भान हरपून गेले आहेत. त्यावेळेसच हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. 

Updated: Jan 1, 2023, 11:45 PM IST

Snakes Mating Video Viral : प्रत्येक व्यक्तीचं एक खाजगी आयुष्य असंत. ज्यात ते आपल्या जोडीदाराच्या अगदी जवळ असतात. अशाचं प्रकारचं प्राण्यांची देखील प्रायव्हेट लाईफ असते. नाग-नागिणीचे(Snakes Mating) प्रायव्हेट क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा व्हिडिओ  इंटरनेटवर तुफान व्हायरल(Video Viral) झाला आहे. यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

snake._.world नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन   नाग-नागिणीच्या प्रणयाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहेत. तसेच या व्हिडिओवर कमेंट्सचा देखीव वर्षाव होत आहे. 
हा व्हिडिओ एका जंगलातील आहे. नाग आणि नागिण एकमेकांच्या सहवासात भान हरपून गेले आहेत. त्यावेळेसच हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. जवळपास 15 ते 30 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला पाच हजार पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. 

नाग-नागिणीच्या मिलनाबाबत अनेक समज गैरसमज

हिंदी चित्रपटात नाग-नागिणीच्या प्रणयाचे दृश्य पहायला मिळते. नाग-नागिणीच्या मिलन हे प्रत्यक्षात पहायला मिळणे हा अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो. नाग-नागिणीच्या मिलनाबाबत अनेक समज गैरसमज आहेत. सापांचं मिलन पाहिल्यानं धनलाभ होतो असा समज आहे. मात्र, हा चुकीचा समज असल्याचं सर्पमित्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *