Shriya Pilgaonkar : ताजा खबर! सचिन पिळगावकरांची लेक साकारणार सेक्स वर्करची भूमिका

shriya-pilgaonkar-:-ताजा-खबर!-सचिन-पिळगावकरांची-लेक-साकारणार-सेक्स-वर्करची-भूमिका

News

  • मुख्यपृष्ठ
  • करमणूक &nbsp/ बॉलीवूड – bollywood news
  • Shriya Pilgaonkar : ताजा खबर! सचिन पिळगावकरांची लेक साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Shriya Pilgaonkar : अभिनेत्री श्रिया पिळगावकरची ‘ताजा खबर’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shriya Pilgaonkar Sachin Pilgaonkar Lek will play the role of a sex worker Shriya Pilgaonkar shared the trailer Taaza Khabar web series Shriya Pilgaonkar : ताजा खबर! सचिन पिळगावकरांची लेक साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Shriya Pilgaonkar

Shriya Pilgaonkar : ‘क्रॅकडाऊन’ (Crackdown),’द ब्रोकन न्यूज’ (The Broken News) आणि गिल्टी माइंड्स’ (Guilty Minds) अशा दमदार वेबसीरिजच्या माध्यमातून सचिन पिळगावकरांची (Sachin Pilgaonkar) लेक अर्थात श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) घराघरांत पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा श्रिया ‘ताजा खबर’ (Taaza Khabar) या वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. 

‘ताजा खबर’ या वेबसीरिजच्या माध्यमातून श्रिया लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये ती सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर आऊट झाला आहे. श्रियाची ही भूमिका नक्कीच वेगळी ठरणार याचा ट्रेलरवरुन अंदाज येत आहे.

श्रिया पिळगावकरची ‘ताजा खबर’ ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. येत्या 6 जानेवारीला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता श्रियाच्या चाहत्यांना या सीरिजची उत्सुकता लागली आहे. 

सेक्स वर्करच्या भूमिकेबद्दल श्रिया म्हणाली,”ताजा खबर’ या वेबसीरिजबद्दल मी खूप उत्सुक आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून कधीही न केलेली भूमिका मला करायला मिळाली आहे. आजवर मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण या भूमिकेचा अनुभव वेगळा आहे”. 

श्रिया पिळगावकरसह या सीरिजमध्ये युट्यूब स्टार भुवन बाम, प्रथमेश परब, देवेन भोजनी, नित्या माथुर, अतिशा नाईक, शिल्पा शुक्ला हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘जादू की चमत्कार, धोका की विश्वास, वरदान की शाप? पाहा वस्याची अनोखी कहाणी, अशा कॅप्शन देत श्रियाने या वेबसीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

संबंधित बातम्या

IMDb Top Indian Web Series: ‘पंचायत’ ते ‘दिल्ली क्राइम’; 2022 च्या टॉप 10 वेब सीरीजची यादी IMDb कडून जाहीर

Published at : 15 Dec 2022 07:58 AM (IST) Tags: web series Shriya Pilgaonkar ENTERTAINMENT Taaza Khabar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *