Shoking! रोमान्स करताना तरुणीने पाडला त्याच्या कानाचा तुकडा; कचाकचा चावून खाल्ला

मराठी बातम्या /बातम्या
/Viral
/
Shocking! रोमान्स करताना चढला इतका जोश की तरुणीने पाडला त्याच्या कानाचा तुकडा; कचाकचा चावूनही खाल्ला
Shocking! रोमान्स करताना चढला इतका जोश की तरुणीने पाडला त्याच्या कानाचा तुकडा; कचाकचा चावूनही खाल्ला
रोमान्स करताना तरुणीने चावला त्याचा कान. (फोटो सौजन्य – Viral Press)
थायलँडमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची तरुणीसोबतची ती रात्र भयंकर ठरली.
- News18 Lokmat
- Last Updated :
- Mumbai, India
-
Published by: Priya Lad
बँकॉक, 25 ऑगस्ट : कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचा वाईट परिणाम होतोच. रोमान्सही याला अपवाद नाही. अशाच रोमान्सचा फटका बसला आहे तो एका व्यक्तीला. थायलँडमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या या व्यक्तीने एका तरुणीसोबत एक रात्र घालवण्याचा विचार केला. दोघंही नशेत होते. तरुणीला इतका जोश चढला की तिने त्या व्यक्तीचा कानाच्या तुकडाच पाडला आणि धक्कादायक म्हणजे तिने तो त्याच्यासमोर कचाकचा चावूनही खाल्ला.
55 वर्षांची ही व्यक्ती थायलँडमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली. एक रात्र सेक्स वर्करसोबत घालवण्याचा विचार केला. पटायातील एका ट्रॅफिक सिग्नवरून तो एका तरुणीला आपल्यासोबत कारमध्ये घेऊन गेला. हा क्षण अविस्मरणीय बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण तरुणीने त्याच्यासोबत भलताच कांड केला.
हे वाचा – आई होण्यासाठी 9 महिन्यांच्या प्रेग्नंट मैत्रिणीचं फाडलं पोट; महिलेचं धक्कादायक कृत्य
दोघंही दारू प्यायले. तरुणी खूप दारू प्यायली. तरुणीला नशेत टल्ली झाल्याचं पाहून आता आपण खूप एन्जॉय करू असं त्याला वाटलं. पण घडलं भलतंच. तरुणी त्याच्याजवळ आली आणि त्याच्या उजव्या कानाला जोरात चावली. ती व्यक्ती वेदनेने ओरडत होती पण तरुणी थांबतच नव्हती. ती इतक्या जोरात चावली की त्याचा कानच तुटला. तरुणीने त्याच्यासमोरच त्याचा कान चावून खाल्ला.
हे वाचा – धक्कादायक! डॉगीने खाल्ली स्वतःचीच शेपटी मालकाला झाली अटक; नेमकं प्रकरण काय?
त्यानंतर ड्राइव्हरयने तात्काळ पोलिसांना फोन केला. त्यानंतर तरुणीला अटक करण्यात आला. तरुणीचं नाव कणिका कंटो असल्याचं सांगितलं जातं आहे. थायलँडमध्ये ती बऱ्याच वर्षापासून काम करते. पण यावेळी ती खूप दारू प्यायली. आपण काय करत आहोत, याची तिला शुद्धच नव्हती. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने नशेत हे केल्याचं म्हटलं.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Thailand, Viral, World news