Shocking! उन्हात काम करून तापला हत्ती; रागात मालकाला सुळांनी चिरलं, केले 2 भाग

बँकॉक 20 ऑगस्ट : कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांप्रमाणेच अवाढव्य असलेला हत्ती जो जंगली प्राणी म्हणून ओळखला जातो त्याचीही माणसांशी पटकन मैत्री होते. त्यामुळे हत्तींना पाळल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. हत्ती शरीराने मोठे असले तरी इतर जंगली प्राण्यांप्रमाणे ते माणसांवर कारणाशिवाय अचानक हल्ला करत नाहीत. पण जर का ते चवताळले तर मात्र काही खरं नाही. अशा एका संतप्त पाळीव हत्तीने आपल्या मालकावर हल्ला केला आहे. आपल्या धारदार सुळांनी त्याने मालकाला चिरून फाडलं. मालकाच्या शरीराचे दोन भाग केले. थायलँडमधील ही धक्कादायक घटना आहे.
थायलँडमध्ये राहणारा 32 वर्षांचा सुपचै वोंगफॅड ज्याने एक हत्ती पाळला. पॉम पॉम असं या हत्तीचं नाव. पॉम पॉमनेच सुपचैचा जीव घेतला आहे. पॉम पॉमनेच सुपचैवर इतका खतरनाक हल्ला केला की त्याच्या मृत्यू झाला. पहांग नगाच्या रबर प्लांटेशनवर घडलेली ही घटना. जिथं सपुचैचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सापडला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं.
हे वाचा – शेपटी, पाय खेचून खेचून बिबट्यासारख्या खतरनाक प्राण्याचाही घेतला जीव; माणसांच्या संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL
पॉम पॉम 20 वर्षांचा आहे. जंगलात रबराची लाकडं उचलून ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतो. ज्यावेळी त्याने सुपचैचा जीव घेतला त्यावेळीही तो हेच काम करत होता. थायलँडमध्ये सध्या भीषण ऊन आहे. त्यादिवशीही वरून सूर्य आग ओकत होता आणि पॉम पॉम काम करून करून थकला होता. ऊन आणि कामाचं ओझं सहन न झाल्याने तो संतप्त झाला. उन्हातही अधिक काम करवून घेणाऱ्या मालकाचा त्याने सूड उगवला. पॉम पॉमने सुपचैच्या शरीरात आपले सुळे खुपसले आणि त्याला सुळ्यांनी चिरलं. त्याच्या शरीराचे चिरून दोन भाग केले.
हे वाचा – अशीही मर्कटलीला ; माकडाने असं काही केलं की पोलीस आले धावत-पळत
आशियाई हत्तींना अशी जंगलात लाकडांची वाहतूक करण्यासाठी ओळखलं जातं. हे हत्ती जंगलातील कामं करण्यासाठी पाळले जातात. त्यांच्याकडून अशी अवघड कामं करून घेतली जातात. 1989 साली या हत्तींना पाळण्यासाठी आणि त्यांच्याकडून काम करून घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण तरी काही ठिकाणी त्यांचा असा वापर केला जातो. अशाच लोकांपैकी एक असलेला सुपचैला आपला जीव गमवावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.