Share Market : शेअर बाजारावर Corona चा कहर, सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकाचे शीर्षासन, निफ्टीतही धडामधूम

share-market-:-शेअर-बाजारावर-corona-चा-कहर,-सलग-दुसऱ्या-दिवशी-निर्देशांकाचे-शीर्षासन,-निफ्टीतही-धडामधूम

Share Market : शेअर बाजारावर कोरोनाची दहशत दिसून आली. त्यामुळे अनेकांना कापरे भरले..

Share Market : शेअर बाजारावर Corona चा कहर, सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकाचे शीर्षासन, निफ्टीतही धडामधूम

बाजारात घसरणीचे सत्र

Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : चीनसह (China) इतर अनेक देशात कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे देशांना आर्थिक धक्के बसायला सुरुवात झाली आहे. अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजाराला (Share Market) ही दृष्ट लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात दहशतीचे वातावरण आहे. बाजारात मोठी घसरण दिसून आली. बीएसई निर्देशांकात (BSE Sensex) गुरुवारी 200 अंकांची घसरण झाली. बुधवारी, 21 डिसेंबर 2022 रोजी 30 शेअरचा निर्देशांक 635 अंकांनी घसरला होता.

आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी भारतीय शेअर बाजारात कालच्या घसरणीनंतर आजही पडझडीचे सत्र दिसून आले. बाजाराची सुरुवात होताच उलटे वारे वाहू लागले. सकाळी 9:15 वाजता Sensex 190 अंकांच्या तेजीसही 61,257 अंकावर सुरु झाला. तर Nifty ने 90 अंकाची उसळी घेतली. त्यानंतर घसरणीचे सत्र सुरु झाले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकात 241.02 टक्क्यांची घसरण झाली. निर्देशांक 60,826.22 अंकावर बंद झाला. व्यापारी सत्रात निर्देशांक 60,656.51 अंकांच्या खाली घसरला. त्यानंतर त्यात थोडीशी सुधारणा झाली. राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजमध्ये, निफ्टीत 85.25 अंकांची घसरण झाली. निफ्टी 18,113.85अंकावर बंद झाला.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने पंख पसरले आहेत. चीननंतर जपान, अमेरिका आणि अनेक देशात नवीन व्हेरियंटचा कहर सुरु आहे. गेल्या 24 तासात जगभरात 5.37 लाखांपेक्षा जास्त केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये 1396 रुग्णांचा मृत्यू झाला.  चीनमध्ये कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

जपानमध्ये 2.06 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. त्यात 296 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत 50 हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. संसर्गाचे प्रमाणही जास्त आहे. सध्या हिवाळा सुरु असल्याने हे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत 323 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *