Second Hand मार्केटमध्ये या गाड्यांना मोठी मागणी, देखभाल खर्चही परवडणारा

second-hand-मार्केटमध्ये-या-गाड्यांना-मोठी-मागणी,-देखभाल-खर्चही-परवडणारा

Second Hand Car Market: काही जण नवीन ऐवजी जुनी कार घेणे पसंत करतात. नुकताच, जुन्या कारशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेकंड हँड कारची यादी नमूद करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला या यादीबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.

Updated: Nov 27, 2022, 04:08 PM IST

Second Hand Car Demand In Market: प्रत्येकाला नवीन कार घेणं परवडतंच असं नाही. त्यामुळे अनेकजण सेकंड हँड कारचा पर्याय निवडतात. भारतात सेकंड हँड कार मार्केट खूप मोठं आणि प्रसिद्ध आहे. नवी कार घेणं ज्या लोकांना परवडत नाही, असे लोक जुनी कार घेणं पसंत करतात. कारण सेकंड हँड कार बजेटच्या हिशोबाने परवडणारी असते. त्यामुळे भारतात नव्या कारच्या तुलनेत जुन्या गाड्यांची विक्री सर्वाधिक होते. नुकतंच जुन्या गाड्यांबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारमध्ये तीन गाड्यांचा समावेश आहे. जर तुम्हीही सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

या गाड्यांची सर्वात जास्त डिमांड

आर्थिक वर्ष 2022 मध्ये, 49 टक्के बाजारपेठेतील युटिलिटी वाहनांनी छोट्या कार (45%) आणि सेडान (3%) ला मागे टाकले. याच कालावधीत, मोठ्या (8% ते 3%) आणि लहान (65% ते 45%) कारच्या वार्षिक विक्रीत घट झाली आहे. ओएलएक्स प्लॅटफॉर्म डेटानुसार प्री-ओन्ड कार सेगमेंटमध्ये Hyundai Creta, Maruti Brezza, Maruti Ertiga आणि Mahindra XUV500 या सर्वात लोकप्रिय एसयूव्ही आहेत. मारुती बलेनो, ह्युंदाई एलिट i20, रेनॉल्ट क्विड, मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ग्रँड i10 या प्री-ओनड सेगमेंटमधील लोकप्रिय लहान कार आहेत. या गाड्या सरासरी 5 वर्षे जुन्या आहेत. दुसरीकडे, होंडा सिटी ही भारताची आवडती सेडान राहिली आहे.

बातमी वाचा- Fixed deposits vs Liquid Funds: तुमचा फायदा कुठे आहे, फरक समजून घ्या आणि योग्य पर्याय निवडा

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2022 या वर्षातील जुन्या कारचं मार्केटनं कोरोनापूर्वीची स्थिती गाठली आहे. सेकंड हँड कारचं मार्केट 2022 या वर्षात 4.1 दशलक्ष युनिट्सवरून 2027 मध्ये 8.2 दशलक्ष युनिट्सपर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *