Salman Khan : बॉलिवूडचा

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / बॉलीवूड – bollywood news
- Happy Birthday Salman Khan : कधी सिनेमासाठी खालल्या 30-35 चपात्या तर कधी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत; वयाच्या सहाव्या वर्षी मुंबई गाठणारा Salman Khan आज आहे कोट्यवधींचा मालक!
Happy Birthday Salman Khan : कधी सिनेमासाठी खालल्या 30-35 चपात्या तर कधी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत; वयाच्या सहाव्या वर्षी मुंबई गाठणारा Salman Khan आज आहे कोट्यवधींचा मालक!
Salman Khan
Salman Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदौरमध्ये सलमानचा जन्म झाला. गेली 34 वर्ष वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. सलमानने 1988 साली ‘बीबी हो तो ऐसी’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. आज सलमान बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता असला तरी त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने क्रिकेटर व्हावं.
बॉलिवूडचा ‘बजरंगी भाईजान’ अर्थात सलमान खान बॉलिवूडचा एक आघाडीचा अभिनेता आहे. सर्वाधिक महागड्या अभिनेत्यांच्या यादीत सलमानची गणना केली जाते. प्रत्येक भूमिकेला तो योग्य न्याय देत असतो. सलमानने ‘बीबी हो तो ऐसी’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असलं तरी त्याला ‘मैने प्यार किया’ या सिनेमाच्या माध्यमातून खरी लोकप्रियता मिळाली.
सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अद्याप तो अविवाहित असून अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे. काही अभिनेत्रींसोबतची त्याची प्रकरणं विशेष गाजली. सध्या सलमान ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
News Reels
सलमान सहा वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला इंदौरवरुन मुंबईला घेऊन आले. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. घर चालवण्यासाठी आईला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण सलमानने खूप कष्ट करत आई-वडिलांना चांगले दिवस दाखवले.
‘साजन’ सिनेमासाठी खालल्या 30-35 चपात्या
‘साजन’ हा सिनेमा 1991 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमासाठी भाईजानने खूप मेहनत घेतली होती. वजन वाढवण्यासाठी सलमान 30-35 चपात्या, राजमा आणि भात खात असे. सिनेमातील भूमिका चांगली होण्यासाठी सलमान खूप जेवण करत असे. पण त्याच्या खाण्यावरुन अनेक अफवा
पसरल्या.
कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक सलमान खान!
सलमान खान 2304 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. एका सिनेमासाठी सलमान 60 कोटी मानधन घेतो. सलमान मुंबईत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तसेच त्याचे पनवेलमध्ये एक फार्म हाऊस आहे. तसेच त्याच्याकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत.
संबंधित बातम्या
Happy Birthday Salman Khan : आज की पार्टी मेरी तरफसे… भाईजानचा वाढदिवस; सलमान कोट्यवधींचा मालक, संपत्ती ऐकून व्हाल थक्क
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात