Rochak kohli: रोचक कोहली चे पहली बार मिले हे नवीन गाणे रिलीज

हे गाणे आर म्युझिकद्वारे सादर करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन गौतम गोविंद यांनी केले आहे.
R music
Image Credit source: twitter
संगीत दिग्दर्शक रोचक कोहली (Rochak kohli) यांनी त्यांचे नवीन गाणे (New Song) “पहली बार मिले” नुकतेच रिलीज केले आहे. रोचक कोहली यांची’विक्की डोनर’ चित्रपटातील ‘पानी दा रंग’ आणि ‘अय्यारी’ चित्रपटातील (Film)’ले डुबा’ ही गाणी अधिक प्रसिध्द आहेत.
या नवीन कराराअंतर्गत रोचक कोहलीची पहिली रिलीज “पहली बार मिले” हा ट्रॅक आहे. तो त्यांनी दोन दिवसांपुर्वी रिलीज केला. रोचक कोहलीच्या ‘पहली बार मिले’ या नवीन गाण्यात, भारतातील अॅरेंज मॅरेजच्या परंपरेला चंचल आणि कोमल रचनेतून दर्शविण्यात आले आहे. हे गाणे आपल्याला प्रेम, स्विकार आणि आनंदाच्या प्रवासाला घेऊन जाते. या गाण्यात एक नवविवाहित जोडपे टॉय ट्रेनमध्ये बसून हिमालयाचे सौंदर्य न्याहाळत त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात मग्न झालेले दिसत आहेत.
रोचक कोहली म्हणतात, “आपल्या देशात प्रतिभेचा सागर आहे” आणि आर म्युझिकच्या सहाय्याने संगीत कलाकारांची पुढची पिढी विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच आम्ही पहिल्याच वर्षी 25 ओरिजनल गाणी रिलीज करण्याची योजना आखली आहे. ज्यामध्ये आमचे लक्ष गाण्यांच्या गुणवत्तेवर आहे. अमित आणि इनग्रूव्हज हे माझे भागीदार आहेत याचा मला आनंद आहे. हा प्रवास आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
हे गाणे आर म्युझिकद्वारे सादर करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन गौतम गोविंद यांनी केले आहे. गाण्याचे बोल गुरप्रीत सैनी यांनी लिहिले असून पियुष अग्निहोत्री याचे निर्माता आहेत.