Ritesh Deshmukh चं 'वेड' पाहून थक्क व्हाल; बेभान होऊन असं काही केलं की….

ritesh-deshmukh-चं-'वेड'-पाहून-थक्क-व्हाल;-बेभान-होऊन-असं-काही-केलं-की….

मुंबई, 11 डिसेंबर : आपल्या उत्कृष्ठ अभिनयामुळे लोकांच्या मनात घर करणारा अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. कायमच तो त्याची बायको जेनेलियासोबत फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. सध्या तो आणि जेनेलिया त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ मुळे चर्चेत आहे. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रितेश आणि जेनेलिया सध्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच रितेश देशमुखचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

रितेश देशमुखचा ‘वेड’ प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. रितेशने आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुण्यातील एका कॉलेजमध्ये हजेरी लावली. यावेळी रितेश बेभान होऊन ढोल वाजवताना दिसला. त्याच्या आजूबाजूला चाहत्यांनी, कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गर्दी केलेली दिसत आहे. एवढंच नाही तर रितेशने ‘वेड’ नावाचा लाल रंगाचा टी-शर्टही घातला आहे. त्याचा हा व्हिडीओ राजश्री मराठीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आदरयम्ला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

‘वेड’ चित्रपटातून जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. एवढंच नाहीतर वेड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रंग माझा वेगळा मालिकेत स्पेशल एन्ट्री करणार “जेनीलिया डिसूज़ा”. हा सगळा अट्ट्टाहास जेनेलिया आणि रितेश यांच्या येणाऱ्या आगामी चित्रपट ‘वेड’ साठी आहे.  रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश देशमुख सांगत आहे की, प्रेम सापडल्यावर आनंद मिळतो, पण प्रेम अपूर्ण राहिल्यावर एकटेपणा मिळतो. टीझर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी टीझरला खूप सारं प्रेम दिलेलं पहायला मिळालं.

दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा अपूर्ण राहिलेल्या प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षवर किती खरा उतरतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *