Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत ICU मध्ये, जाणून घ्या हेल्थ अपडेट

rishabh-pant-car-accident:-ऋषभ-पंत-icu-मध्ये,-जाणून-घ्या-हेल्थ-अपडेट

ऋषभ पंत ICU मध्ये, उपचार सुरु (फाइल फोटो)

रोहित गोळे

Rishabh Pant in ICU: देहरादून: भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) आज (30 डिसेंबर) कार अपघातात (Car Accident) गंभीर जखमी झाला. पंतची मर्सिडीज कार ही दिल्ली-डेहराडून महामार्गावरील रस्ता दुभाजकावर आदळली, त्यानंतर तिला आग लागली. त्यावेळी पंत कसा तरी कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. या अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असून त्याला सध्या डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता पंतच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट (Health Update) समोर आली आहे. (rishabh pant car accident now rishabh in icu know the latest health update of star cricketer)

पंतची प्रकृती स्थिर, पण…

अपडेटनुसार, 25 वर्षीय ऋषभ पंत सध्या आयसीयूमध्ये आहे पण तो पूर्णपणे बरा आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. मॅक्स हॉस्पिटल प्रशासनाला ऋषभच्या प्रकृतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, ऋषभवर उपचार सुरू असून सध्या त्याला अन्य ठिकाणी हलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऋषभची आईही येथेच असून, सुरु असलेल्या उपचारांबाबत ती समाधानी आहे. दिल्लीतील मॅक्सचे मुख्य कार्यालय पंतची आई, डॉक्टर आणि बीसीसीआयच्या संपर्कात आहे.

ऋषभच्या प्रकृतीवर बीसीसीआयची नजर

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे आणि आम्ही त्याच्या प्रकृतीच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आम्ही डॉक्टरांच्या टीमच्या सतत संपर्कात आहोत. या क्षणी, आम्हाला असे वाटत नाही की त्याला इतरत्र हलविण्याची काही गरज आहे.’

डॉक्टरांनी काय दिली माहिती?

आपत्कालीन विभागात पंतवर उपचार डॉक्टर सुशील नागर म्हणाले की, पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली असून त्याची अधिक तपासणी करावी लागेल, असे त्यांनी सांगितलं आहे. ‘जेव्हा त्याला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले तेव्हा तो पूर्णपणे शुद्धीत होता आणि मी त्याच्याशी बोललोही, खरं त्याला अचानक घरी जाऊन त्याच्या आईला सरप्राईज द्यायचं होतं.’

‘त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे, पण मी त्याला टाके घातले नाहीत. मी तिला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले जेथे प्लास्टिक सर्जन त्याची दुखापत पाहू शकतल. एक्स-रेमध्ये तरी हाड तुटलेले नाही. पण उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे या दुखापतीचं गांभीर्य किती आहे हे एमआरआय किंवा इतर चाचण्यांमधून समजू शकेल.’

लिगामेंटची दुखापत बरी होण्यासाठी दोन ते सहा महिने लागतात. पंतच्या पाठीवर मोठी जखम झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ज्या जखमा दिसत आहेत त्याआगीमुळे झालेल्या जखमा नाहीत.

डॉ. नागर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, ‘त्याच्या पाठीला जखम झाली कारण जेव्हा गाडीला आग लागली त्यावेळी त्याने कारची खिडकी तोडली तिथून उडी मारली. त्याचवेळी त्याच्या पाठीला जखमा झाल्या. त्यामुळे या जखमा काही गंभीर नाहीत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *