Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; उपचारांसाठी दिल्लीला रवाना

rishabh-pant-accident-:-ऋषभ-पंतच्या-गाडीला-भीषण-अपघात;-उपचारांसाठी-दिल्लीला-रवाना

Rishabh Pant : हा अपघात इतका भयंकर होता पंतच्या कारचा अक्षरशः कोळस झाला आहे. 

Updated: Dec 30, 2022, 09:29 AM IST

Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारला हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे. हा अपघात इतका भयंकर होता पंतच्या कारचा अक्षरशः कोळस झाला आहे. 

कसा झाला अपघात?

दिल्लीवरून घरी परतत असताना पंतची कार रेलिंगला धडकली आणि हा अपघात झाला. रेलिंगला धडक दिल्यानंतर गाडीने पेट घेतला आणि काही वेळातच पंतची गाडी जळून खाक झाली. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र पंतला गंभीर जखमा झाल्या असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

प्रत्यक्षदर्शींनीही पंतची कार रेलिंगला धडकल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर क्षणात गाडीने पेट घेतला आणि काही वेळातच ती जळून खाक झाली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर अपघातात जखमी झालेल्या पंतला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे पंत त्याच्या गाडीने दिल्लीवरुन रुडकी येथून त्याच्या घरी जात होता. त्याचवेळी नारसन गावाजवळ त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती रेलिंगला धडकून उलटली.

Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway near Roorkee border, car catches fire. Further details awaited. pic.twitter.com/qXWg2zK5oC

— ANI (@ANI) December 30, 2022

पंतवर होणार प्लास्टिक सर्जरी ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्राथमिक माहिती देताना त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाल्याचे म्हटले आहे. अपघातानंतर पंतला सुरुवातीला जवळच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सक्षम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुशील नागर यांनी, “पंतची प्रकृती सध्या स्थिरआहे. पुढील उपचारांसाठी त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे,” अशी माहिती दिली आहे.

पंतवर होणार प्लास्टिक सर्जरी

ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्राथमिक माहिती देताना त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाल्याचे म्हटले आहे. अपघातानंतर पंतला सुरुवातीला जवळच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सक्षम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुशील नागर यांनी, “पंतची प्रकृती सध्या स्थिरआहे. पुढील उपचारांसाठी त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे,” अशी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *