Rishabh Pant: धोनीच्या वेगात पंतने उडवल्या विकेटच्या दांड्या; Video होतोय व्हायरल!

rishabh-pant:-धोनीच्या-वेगात-पंतने-उडवल्या-विकेटच्या-दांड्या;-video-होतोय-व्हायरल!

Rishabh Pant, MS dhoni: अक्षर पटेलच्या अफलातून बॉल हुकल्यावर पंतनं (Rishabh Pant Stumping) हसनला स्टंप केलं. पटेलने 88 व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला. ऑफ स्टंपवर पडताना हा चेंडू बाहेरच्या बाजूला आला, त्यावर…

Updated: Dec 18, 2022, 12:45 AM IST

BAN vs IND: भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पहिली टेस्ट सिरीज (BAN vs IND test series) खेळवली गेली. 14 डिसेंबर रोजी या दोन्ही संघात पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशी टीमला 513 रन्सचं आव्हान दिलं होतं. तर बांग्लादेशाच्या टीमचा पहिला डाव अवघ्या 150 रन्सवर आटोपला. भारतीय गोलंदाजांच्या बॉलिंगची धार यावेळी दिसून आली. (Rishabh Pant Blows Wicket Sticks in ms dhonis Pace BAN vs IND 1st test marathi news)

नुरुल हसनच्या (Nurul Hasan) रूपाने बांग्लादेशने चौथ्या दिवशी सहावी विकेट गमावली. अक्षर पटेल (Akshar Patel) गोलंदाजीचा तो सर्वोत्तम विकेट ठरला. अक्षर पटेलच्या अफलातून बॉल हुकल्यावर पंतनं (Rishabh Pant) हसनला स्टंप केलं. पटेलने 88 व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला. ऑफ स्टंपवर पडताना हा चेंडू बाहेरच्या बाजूला आला, त्यावर हसन चुकला आणि मागे उभा असलेल्या रिषभने कोणतीही चूक केली नाही.

आणखी वाचा – तुम्हीच सांगा, Out की Not Out पाकिस्तानचा बाबर आझम रागाने झाला लालबुंद!

बॉल मिस झाल्यावर मागे उभा असलेल्या रिषभने (Rishabh Pant Stumping) संधी चुकवली नाही. त्याने आलेल्या चेंडू पटकन हाती घेत स्टंपिंग केली. त्यावेळी नुरूल हसनचा हात लाईनच्या पुढे गेला होता. रिषभने सेकंदाची वाट न पाहता बेल्स उडवले आणि टीम इंडियाने (Team India) जल्लोष साजरा केला.

पाहा Video – 

Incredible stumping from Pant. pic.twitter.com/iwbXcNCtrc

— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2022

दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 6  विकेट गमावून 272 धावा केल्या आहेत. कर्णधार शकीब अल हसन (shaqib al hassan) नाबाद 40 आणि मेहदी हसन (Mehdi hasan) 9 धावा करत मैदानात टिकून आहे. बांग्लादेश अजूनही 241 धावांनी पाठलाग करताना दिसत आहे. त्यामुळे आता आजचा दिवस महत्त्वाचा राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *