Skip to content
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार भीषण कार अपघातात जखमी झालाय.
रुडकीला परताना हरिद्वार जिल्ह्यातील गुरुकुल नारसन परिसरात ऋषभ पंतची कार दुर्घटनाग्रस्त झाली.
अपघाताचे काही फोटो समोर आले असून, ऋषभ पंतला गंभीर जखमा झालेल्या दिसत आहेत.
ऋषभ पंत सकाळी 5.15 वाजता दिल्लीवरून परत रुडकीला चालला होता.
ऋषभ पंतची कार रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. कार वेगात असल्यानं भीषण अपघात घडला.
कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या पायाला गंभीर जखम झाली आहे.
अपघातानंतर ऋषभ पंतच्या बीएमडब्ल्यू कारने पेट घेतला. त्यानंतर पहाटे झालेल्या या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली.