Ranbir Shraddha च्या आगामी चित्रपटाचं नाव आलं समोर; पोस्ट पाहून चाहते बुचकळ्यात

मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर आगामी चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. दोघेही पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. त्यामुळे रणबीर आणि श्रद्धाचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या चर्चा पहायला मिळत आहे. या चिपटाचं नाव नेमकं काय असणार यावरुनही अनेक चर्चा रंगलेल्या पहायला मिळाल्या. अशातच त्यांच्या चित्रपटाचं नाव समोर आलं असून दिग्दर्शक लव रंजन यांनी चित्रपटाचं नाव सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी चित्रपट लव रंजन दिग्दर्शित आहे. लव रंजन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यांनी चित्रपटाच्या नावाची हिंट दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसतंय की, TJMM लव रंजन फिल्म्स. टायटल उद्या रिलीज होईल. त्यामुळे दिग्दर्शकांनीही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी चित्रपटाच्या नावाचं टीझर दिलंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आता रणबीर आणि श्रद्धाच्या चित्रपटासाठी आणि नावासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
And the title is…… Guess Karo ??? 😜#RanbirKapoor @ShraddhaKapoor @luv_ranjan #AnshulSharma #RahulMody @gargankur #BhushanKumar @TSeries pic.twitter.com/SvbtM0dgMM
— Luv Films (@LuvFilms) December 13, 2022
रणबीर श्रद्धाच्या आगामी चित्रटाच्या नावासोबत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात येणार आहे. लव रंजन फिल्म्स यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टवर सध्या प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण कमेंट करत चित्रपटाचं नाव काय असेल, काय असू शकतं याचा अंदाज लावत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांचा अंदाज किती खरा ठरतो हे पाहणं चागलंच उत्सुकतेचं ठरणार आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना किती आवडते आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहणं खूपच उत्कंठावर्धक ठरणार आहे.
दरम्यान, रणबीर लव रंजन यांच्या चित्रपटाव्यतिरिक्त ‘अॅनिमल’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ सुंदरी रश्मिका मंदाना झळकणार आहे. श्रद्धा कपूर रुखसाना कौसरच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.