Ranbir-Alia: जेव्हा रणबीरने घुडघ्यावर बसून आलियाला केलं होतं प्रपोज; सोनी राजदान यांनी डिलिट केलेला

ranbir-alia:-जेव्हा-रणबीरने-घुडघ्यावर-बसून-आलियाला-केलं-होतं-प्रपोज;-सोनी-राजदान-यांनी-डिलिट-केलेला

Ranbir-Alia: जेव्हा रणबीरने घुडघ्यावर बसून आलियाला केलं होतं प्रपोज; सोनी राजदान यांनी डिलिट केलेला 'तो' फोटो व्हायरल

Alia and Ranbir

Image Credit source: Instagram

मुंबई: अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आई-बाबा म्हणून आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली. रणबीर-आलियाची लव्ह-स्टोरी जगजाहीर असली तरी रणबीरने आलियाला नेमकं प्रपोज कसं केलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आता या प्रपोजलचा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी शेअर केला होता. मात्र नंतर तो त्यांनी डिलिट केला.

सोनी राजदान यांनी इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये रणबीर-आलियाच्या प्रपोजलचा फोटो होता. आफ्रिकेतील मसाई मारा या ठिकाणी फिरायला गेले असता रणबीरने आलियाला प्रपोज केलं होतं. या फोटोमध्ये रणबीर त्याच्या गुडघ्यावर बसून आलियाला अंगठी देताना दिसतोय. तर आलिया आनंदाने भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.

सोनी राजदान यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आलिया आणि रणबीरच्या लग्नातील काही खास फोटोसुद्धा होते. वर्षभरातील आनंदी क्षणांचे फोटो त्यांनी या व्हिडीओत शेअर केले होते. बुधवारी आलियानेही असाच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम शेअर केला होता. जे फोटो इन्स्टावर पोस्ट करता आले नाहीत, असे फोटो तिने या व्हिडीओत एकत्र दाखवले होते.

रणबीर-आलियाने यावर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. तर 6 नोव्हेंबर रोजी आलियाने मुलीला जन्म दिला. रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं. आलियाने सध्या चित्रपटांपासून ब्रेक घेत लेकीला वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर रणबीरचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *